IND vs ENG U19 World Cup Final 2022: अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने- सामने येणार आहे. अंडर-19 विश्वचषकातील अंतिम सामना आज (5 फ्रेब्रुवारी) वेस्ट इंडिजमधील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पाचव्यांदा विजेतेपदासाठी उतरेल. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत चांगली कामगिरी बजावलीय. परंतु, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघातील तीन खेळाडू भारतासाठी मोठा अडथळा ठरू शकतात. या तीन खेळाडूंनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडच्या संघानं अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिलीय. 





 


1) टॉम प्रेस्ट: इंग्लिश संघाचा कर्णधार टॉम पर्स्ट भारतीय संघासाठी सर्वात मोठी समस्या निर्माण करू शकतो. या संपूर्ण विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं पाच सामन्यांमध्ये 73 च्या सरासरीनं 292 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याचा स्ट्राइक रेट 103.85 आहे, जो टॉप-10 लीड स्कोअरर्समध्ये सर्वाधिक आहे. टॉम पर्स्टनं विश्वचषकात यूएई विरुद्ध सामन्यात 154 धावांची नाबाद खेळी केली होती. 


2) जोशुआ बॉयडेन: जोशुआ बॉयडेनं हा इंग्लंड संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. या विश्वचषकात जोशुआने 5 सामन्यात 124 धावा देऊन 13 विकेट घेतल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, त्याची गोलंदाजीची सरासरी कमालीची आहे. त्याने गोलंदाजीत 9.53च्या सरासरीनं विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक 9 धावांमागे त्याला एक विकेट मिळालीय. 


3) रिहान अहमद: इंग्लंडचा फिरकीपटू रिहान अहमदनं या विश्वचषकात चांगलीच छाप पाडली. रहमाननं केवळ 3 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरीही 10 च्या आत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक उपांत्य सामन्यात रहमानने 4 बळी घेत इंग्लिश संघाला 15 धावांनी विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha