India vs West indies Deepak Hooda : वेस्ट इंडिजविरोधात सहा फेब्रुवारीपासून भारत एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. वेस्ट इंडिजविरोधातील मालिकेसाठी संघात अनेक युवा आणि प्रतिभावंत खेळाडूंना स्थान दिलेय. या नावापैकच एक नाव म्हणजे दीपक हुडा होय. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलेल्या दीपक हुडाला भारतीय संघाचं तिकीट मिळालं आहे. रविवारी सुरु होणाऱ्या मालिकेआधी दीपक हुडाला भारतीय संघाची जर्सी मिळाली आहे. दीपकने टीम इंडियाच्या जर्सीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. 
 
दीपक हुडाला भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळाताना दीपकने अनेकदा सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. तसेच स्थानिक क्रिकेटमध्येही त्यानं आपली प्रतिभा दाखवून दिली. फलंदाजीसोबत गोलंदाजीतही दीपकने कमाल केली आहे. आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात अनेक दिग्गज फलंदाजांना अडकवले आहे. दीपक हुडाने ट्वीटरवर टीम इंडियाच्या जर्सीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दीपक कमालीचा खूश दिसतोय. दीपकच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय. दीपकला 57 क्रमांकाची जर्सी देण्यात आली आहे. दीपकच्या फोटोवर ट्वीटवर 57 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी दीपक हुडाला शुभेच्छाही दिल्या आहेत. 


दीपक हुडाने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 46 प्रथम श्रेणी सामन्यात दीपकने 2908 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने 9 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान दीपकने 20 विकेटही घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये दीपकने 74 सामन्यात 2257 धावा चोपल्या आहेत. यामध्ये चार शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. 35 विकेटही घेतल्या आहेत. त्यासोबतच 141 एकदिवसीय सामन्यात 2172 धावांचा पाऊसही पाडलाय. 


 वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान 


वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.  


कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीसीसीआयने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन टी-20 सामने दोनच मैदानांवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही टी-20 सामने कोलकात्यात खेळवले जातील.  


वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक 
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद


टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता