Jasprit Bumrah : रोहित शर्माच्या भारतीय संघानं विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 106 धावांनी धुव्वा उडवला. त्याआधी पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 28 धावांनी पराभव केला होता. पाच सामन्याच्या कसोटी मालिका 1-1 बरोबरीत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. राजकोटमध्ये दोन्ही संघ आमनेसामने असतील. अखेरच्या तीन कसोटी सामन्यासाठी आज टीम इंडियाची निवड होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आराम देण्यात येणार आहे.
राजकोट कसोटीत जसप्रीत बुमराहाला आराम -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी जसप्रीत बुमरहाला आराम दिला जाऊ शकतो. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण बुमराहाला तिसऱ्या कसोटीतून आराम दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दोन कसोटीत सर्वाधिक विकेट -
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे. बुमराहने दोन कसोटी सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. हैदराबाद कसोटीत बुमराहने 6 विकेट घेतल्या होत्या. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटीत बुमराहने 9 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटीत शानदार गोलंदाजी कऱणाऱ्या बुमराहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताने मालिकेत बरोबरी साधली -
रोहित शर्माच्या भारतीय संघानं विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 106 धावांनी धुव्वा उडवला. भारतीय संघानं या विजयासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या कसोटीत भारतानं इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं होतं. पण आदल्या दिवशीच्या एक बाद ६७ धावांवरून इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमरानं 46 धावांत तीन आणि रवीचंद्रन अश्विननं 72 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मुकेशकुमार, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी एक विकेट काढली. जसप्रीत बुमराला या कसोटीतल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला. त्यानं पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
उर्वरित 3 कसोटी सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली/श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह.