Rahul Dravid on Virat Kohli Comeback : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्याच्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 106 धावांनी हरवत भारताने जोरदार कमबॅक केले. 15 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. राजकोटमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यात अनुभवी विराट कोहलीचं कमबॅक होण्याची शक्यता आहे. मुख्य कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलेय. 


विराट कोहलीच्या कमबॅकवर राहुल द्रविडचं मोठं अपडेट - 


विशाखापट्टणम कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीच्या कमबॅकवर वक्तव्य केले. राहुल द्रविड म्हणाले की, "विराट कोहली तिसऱ्या सामन्यात खेळणार का? हा प्रश्न निवडकर्त्यांना विचारा. ते तुम्हाला योग्य उत्तर देतील. काही दिवसांत अखेरच्या तीन कसोटी सामन्यासाठी संघाची निवड होणार आहे. आम्ही विराट कोहलीसोबत चर्चा करु, पुढे काय होतोय ते पाहूयात. विराट कोहलीच्या कमबॅकवर राहुल द्रविड यांनी स्पष्टपणे उत्तर दिले नाही. त्यावरुन विराट कोहली तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल का? याबाबत सस्पेन्स आहे. 


विराट कोहलीने कौटंबिक कारणामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. आता पुढील तीन सामन्यासाठी विराट कोहली भारतीय संघात कमबॅक करणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. 


भारताने मालिकेत बरोबरी साधली - 


रोहित शर्माच्या भारतीय संघानं विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 106 धावांनी धुव्वा उडवला. भारतीय संघानं या विजयासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या कसोटीत भारतानं इंग्लंडला विजयासाठी 399  धावांचं आव्हान दिलं होतं. पण आदल्या दिवशीच्या एक बाद ६७ धावांवरून इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमरानं 46 धावांत तीन आणि रवीचंद्रन अश्विननं 72 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मुकेशकुमार, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी एक विकेट काढली. जसप्रीत बुमराला या कसोटीतल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला. त्यानं पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं.


विराट कोहली, केएल राहुलचं कमबॅक ?


अजीत आगरकर यांची रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर उर्वरीत तीन कसोटी सामन्यासाठी संघाची निवड करण्यात येईल. विराट कोहली आणि केएल राहुल यांचं कमॅबक होण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहलीने माघार घेतली होती. तर पहिल्या कसोटी सामन्यानंतर राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला तो मुकला होता. त्यामुळे केएल राहुल आणि विराट कोहली यांचं कमबॅक होऊ शकतो.