एक्स्प्लोर

IND vs ENG : आज अखेरचा कसोटी सामना, भारत की इंग्लंड, कोण मारणार बाजी?

IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने आधीच 3-1 ने आघाडी घेतली आहे.

IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने आधीच 3-1 ने आघाडी घेतली आहे. आता अखेरचा सामना जिंकून कसोटी मालिका 4-1 जिंकण्याचा निर्धार टीम इंडियाचा असेल  तर कसोटी मालिकेचा गोड करण्यासाठी इंग्लंड सज्ज झाली आहे. 

पाच कसोटी सामन्याची सुरुवात इंग्लंडने विजयी केली होती. पण त्यानंतर रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पलटवार केला. भारतीय संघाने सलग तीन सामन्यात बाजी मारत मालिका खिशात घातली. आता अखेरचा सामना जिंकून WTC मध्ये अव्वल स्थान पटकावण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.  

जसप्रती बुमराह संघात परतल्याने भारतीय गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. भारतीय संघ तीन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.  जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीवर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. तर आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर फिरकीची धुरा असेल. कुलदीप यादव अथवा अक्षर पटेल यांच्यापैकी एका गोलंदाजाला संधी मिळू शकते. फलंदाजीमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. केएल राहुल तंदुरुस्त नसल्यामुळे रजत पाटीदार याला पुन्हा एकदा संधी मिळू शकते. अथवा देवदत्त पड्डीकल पदार्पण करु शकतो. सरफराज खान यानं राजकोट कसोटीत शानदार खेली केली. पम रांची कसोटीमध्ये त्याला अपयश आले. दुसरीकडे यशस्वी जायस्वाल यानं संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली. त्याला या मालिकेत 800 धावा करण्याची संधी असेल.

अश्विन-बेयरस्टोचं शतक -

आर. अश्विन आणि जॉनी बेयरस्टो यांचा आज 100 वा कसोटी सामना पार पडणार आहे. भारत आणि इंग्लंड आपल्या खेळाडूंना विजयी भेट देण्यासाठी प्रयत्नशील असतील. यामध्ये कोणता संघ बाजी मारेल? याचीच चर्चा सुरु आहे.

इंग्लंडच्या संघात मार्क वूड परतला - 

इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात फक्त एका वेगवान गोलंदाजासह उतरण्याचा निर्णय घेतला होता. पण दोन सामन्यानंतर इंग्लंडने रणनिती बदलली. आता इंग्लंड संघ दोन वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरत आहे. धर्मशाला कसोटी सामन्यात मार्क वूड आणि जेम्स अँडरसन वेगवान गोलंदाजीची धूरा संभाळणार आहे. शोएब बशीर आणि टॉम हार्टले फिरकीची धुरा संभाळतील. त्यांच्या जोडीला जो रुट असेलच.

खेळपट्टी कशी असेल - 

धर्मशालामध्ये तापमान एक डिग्रीपर्यंत आहे. त्यात खेळपट्टी पाटा आहे. धर्मशालाच्या मैदानावर वेगवान गोलंदाजाला मदत मिळण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या विजयात फिरकी गोलंदाजांचा मोठा वाटा होता. 

धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11- 

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर

भारताची संभाव्य 11 - 

यशस्वी जायस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल, रजत पाटीदार/देवदत्त पड्डीकल, सरफराज खान, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, कुलदीप यादव/अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

आणखी वाचा :

IND vs ENG: धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11 जाहीर, मार्क वूड परतला

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ICC Cricket World Cup 2027 : 15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?
15 नकोच, 17 खेळाडूंचा Squad पाहिजे; 6 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमच्या एका मागणीने ICCची झोप उडवली, 2027च्या वर्ल्ड कपमध्ये होणार बदल?
Vaibhav Sooryavanshi : 6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर
6 मॅच खेळताच वैभव सूर्यवंशीची मोठी झेप, ICC च्या टी-20 रँकिंगमध्ये उलथापालथ, वनडे क्रमवारीतही टीम इंडियाचा खेळाडू टॉपवर
SL vs IND 1st Test : 4 फिरकीपटू, 2 वेगवान गोलंदाज अन्...; श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
4 फिरकीपटू, 2 वेगवान गोलंदाज अन्...; श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Vaibhav Sooryavanshi News : भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO
भारतात पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीने काय केलं? 'त्या' एका कृतीने जिंकली सर्वांची मनं; पाहा VIDEO

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget