एक्स्प्लोर

IND vs ENG 4th Test : आजपासून चौथा कसोटी सामना, 50 वर्षांपासून ओव्हलमध्ये टीम इंडिया विजयापासून वंचित, दुष्काळ संपवणार?

England vs India 4th Test : भारताला आतापर्यंत ओव्हल मैदानावर केवळ एकच विजय मिळाला आहे. तो म्हणजे, 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये मिळालेला विजय.

England vs India 4th Test : इंग्लंड विरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यात मिळालेल्या लाजिवारण्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आज सुरु होणारा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लडं यांच्यातील चौथा कसोटी सामना ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, ओव्हलवर इंग्लंडच्या विरोधात टीम इंडियाचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. अशात विराटसेनेसाठी या मैदनावर विजय मिळवणं एक मोठं आव्हान ठरणार आहे. 

भारताला आतापर्यंत ओव्हल मैदानावर केवळ एकच विजय मिळाला आहे. तो म्हणजे, 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये मिळालेला विजय. भारताने या मैदानावर आतापर्यंत 13 कसोटी सामने खळले आहेत. ज्यापैकी 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सात सामने ड्रॉ झाले आहेत. 

द ओव्हलचा पिच इंग्लंडमध्ये फलंदाजीसाठी उत्तम आहे आणि भारतीय फलंदाजांसाठी ही आनंदाजी बाब आहे. गेल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघातील फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक पाहायला मिळाली. धावांचा डोंगर रचण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय फलंदाजांसाठी ओव्हल मैदानावरील पिच पर्वणी ठरु शकतो. दरम्यान, टीम इंडियाकडून चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांकडून फारशी उत्तम खेळी होताना दिसत नाही. 

भारतीय संघ व्यवस्थापनाला ज्या पाच गोलंदाजांना खेळवायचे आहे, त्यामध्ये कदाचित फलंदाजांची फळी मजबूत करण्यासाठी ऑलराउंडर शार्दुल ठाकूरचा समावेश होऊ शकतो. तसेच रविंद्र जाडेजाच्या फिटनेसबाबत अद्याप कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा आजच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. अशातच रवींद्र जाडेजाऐवजी संघात आर, अश्विनला स्थान मिळू शकतं, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टीम इंडिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 2 सप्टेंबरपासून  लंडनमधील ओव्हल  मैदानावर खेळला जाणार आहे.  चौथ्या कसोटीसाठी बीसीसीआयनं नुकतंच इंग्लंडच्या संघासोबतच्या आगामी  चौथ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला. संघात नेमका कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश असेल याचा उलगडा बीसीसायकडून ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. चौथ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. प्रसिद्ध कृष्णाने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यात सहा विकेट घेतले आहे. या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेट आपल्या डेब्यू सामन्यात चार विकेट घेतले होते.

इंग्लंडला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण जो बटलर चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे विकेटकीपिंगची जबाबदारी जॉनी बेयरस्टो सांभाळणार आहे. त्यासोबतच मोइन अली उपकर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. 

दरम्यान, यजमान संघ जेम्स एंडरसन आणि ओली रॉबिंसन यादोघांपैकी कोणाला आराम देतो की, नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण दोन्ही वेगवान गोलंदाजांनी पहिले तीन कसोटी सामने खेळले आहेत. तसेच कसोटी मालिकेत आतापर्यंत अनेक ओव्हर्ससाठी गोलंदाजी केली आहे. 

भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने झाले असून दोन्ही संघानं एक-एक सामना जिंकला आहे. तर पहिला सामना अनिर्णित झाला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget