Ind vs Eng 4th Test Day 5 : मँचेस्टर कसोटी अनिर्णित, गिलनंतर जडेजा अन् सुंदर यांनी ठोकली शतके; इंग्लंड 1-2 ने आघाडीवर

India vs England Day 5 Live Latest Updates : मँचेस्टर कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आहे. भारताला पराभव टाळायचा असेल, तर शेवटच्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.

किरण महानवरLast Updated: 27 Jul 2025 10:15 PM

पार्श्वभूमी

India vs England Day 5 Live Latest Updates : मँचेस्टर कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आहे. भारताला पराभव टाळायचा असेल, तर शेवटच्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. सध्या सर्वांची...More

मँचेस्टर कसोटी अनिर्णित, गिलनंतर जडेजा अन् सुंदर यांनी ठोकली शतके; इंग्लंड 1-2 ने आघाडीवर


भारतीय संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवलं. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 669 धावांची मजल मारत भारतावर 311 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात के. एल. राहुल शुभमन गिल आणि नंतर रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर यांच्यात झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने अंतिम दिवशी दुसऱ्या डावात आघाडी घेतली आणि इंग्लंडच्या विजयाच्या आशा पूर्णपणे उधळून लावल्या. भारताने दुसऱ्या डावात केवळ 4 गडी गमावत 425 धावा केल्या.