Mumbai Metro मुंबई : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील बहुप्रतिक्षित डी. एन नगर ते मंडाळे मेट्रो-2 बी या मार्गिकेचा पहिला टप्पा या महिनाअखेर प्रवासी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) या पहिल्या टप्प्यातील मार्ग मोकळा झाला आहे. तर आज, 10 सप्टेंबरपासून या मार्गावर कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS)  पथकाकडून तपासणी सुरु केली जाणार असल्याची माहिती आहे. सीएमआरएसने सुरक्षा प्रमाणपत्र देताच या मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रवासाचा मुंबईकरांना लाभ घेता येणार आहे.

Continues below advertisement


मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची एकूण लांबी 23.6 किमी


बहुप्रतिक्षित डी. एन नगर ते मंडाळे मेट्रो-2 बी या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गिकेची एकूण लांबी 23.6 किमी इतकी आहे. ज्यामध्ये एकूण 19 स्थानके आहेत. तर पहिल्या टप्प्यातील 5.3 किमी मार्गाची लांबी आहे. पहिल्या टप्प्यात या स्थानकांवर मेट्रो धावणार मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन यांचा समावेश आहे. दरम्यान या मार्गिकेसाठी सुमारे 10,986 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.


मेट्रोला तीन वर्षांचा विलंब


दरम्यान, एमएमआरडीएच्या यापूर्वीच्या नियोजनानुसार 'मेट्रो 2 बी'चे काम ऑक्टोबर 2022 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदारांनी कामे न केल्याने एमएमआरडीएला तीन पॅकेजमधील कंत्राटदार बदलावे लागले होते. यातील दोन पॅकेजमधील कंत्राटदारांची 2021 मध्ये नियुक्ती केली होती. परिणामी मेट्रोला तीन वर्षांचा विलंब लागला असून अखेर पहिल्या टप्प्यातील काम आता अंतिम चरणात असून ते लवकरच सेवेत दाखल होणार आहे.


आणखी वाचा