अहमदाबाद : हिटमॅन रोहित शर्मा इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात केवळ 12 धावा करुन बाद झाला. परंतु, त्याने टी20 क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. आपल्या नावावर हा विक्रम करणारा रोहित दुसरा खेळाडू ठरला आहे. तर जगातील नववा फलंदाज ठरला आहे. 


टी20 मध्ये आपला 342वा सामना खेळणाऱ्या रोहितला हा विक्रम करण्यासाठी केवळ 11 धावांची गरज होती. त्याने आदिल राशिदच्या ओव्हरमध्ये एक षटकार, चौकार आणि एक धाव काढून हा विक्रम पूर्ण केला. 


रोहितच्या नावावर आता टी20 मध्ये 9001 धावांच्या विक्रमाची नोंद आहे. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय टी20 मधील 2800 धावांचाही समावेश आहे. रोहितआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने हा विक्रम आपल्या नावावर केला होता. या सामन्यापूर्वी विराटच्या नावावर 302 सामन्यांमध्ये 9650 धावांच्या विक्रमाची नोंद आहे. 


टी20 मध्ये सर्वाधिक धावा वेस्टइंडियजच्या क्रिस गेल (13720 धावा)च्या नावावर आहे. त्यानंतर वेस्टइंडियजचाच पोलार्ड (10629), पाकिस्तानच्या शोएब मलिक (10488), न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅकुलम (9922), ऑस्टेलियाच्या डेविड वॉर्नर (9824), आरोन फिंच (9718), कोहली, दक्षिण अफ्रीकाचा एबी डिविलियर्स (9111) आणि रोहितचा नंबर येतो.  


भारताचं इंग्लंडसमोर 186 धावांचं आव्हान


इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ट्वेण्टी-20 सामन्यात भारताचा डाव आटोपला. निर्धारित 20 षटकात भारताच्या 8 बाद 185 धावा. भारताचं इंग्लंडसमोर 186 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :