IND vs ENG 4th T20 Live Score | भारताचा 8 धावांनी विजय, मालिकेत 2-2 ने बरोबरी
IND vs ENG 4th T20 Live Score Updates : आज टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे.
भारताने चौथा ट्वेण्टी-20 सामना 8 धावांनी जिंकला, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी
सामन्यातली उत्कंठा वाढली, इंग्लंडला विजयासाठी 3 चेंडूत 12 धावांची गरज
अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 23 धावांची गरज, 19 षटकात इंग्लंडच्या 7 धावा 163
इंग्लंडचे सात फलंदाज बाद, सॅम करन तीन धावा करुन माघारी परतला, 18 षटकात इंग्लंडच्या 7 बाद 153 धावा, विजयासाठी 33 धावांची गरज
इंग्लंडला सहावा धक्का, मॉर्गन 4 धावांवर बाद, इंग्लंडच्या 16.2 षटकात 6 बाद 140 धावा
इंग्लंडला पाचवा धक्का, बेन स्टोक्स 46 धावांवर बाद, 15.3 षटकात इंग्लंडच्या 4 बाद 139 धावा
इंग्लंडची चौथी विकेट, जॉनी बेअरस्टो 25 धावा करुन माघारी परतला. इंग्लंडच्या 14.5 षटकात 4 बाद 131 धावा
बेन स्टोक्सने सुंदरच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार फटकावला. इंग्लंडने 12 ओव्हर्सनंतर तीन विकेट्स गमावत 91 धावा केल्या आहेत. स्टोक्सने 12 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या आहेत. बेयरस्टो 7 धावांवर खेळत आहे.
ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने इंग्लंडच्या जेसन रॉयला माघारी धाडलं. जेसन रॉयने 27 चेंडूंमध्ये 40 धावा केल्या. इंग्लंडचा स्कोअर 10 ओव्हर्समध्ये तीन विकेट गमावत 71 धावा इतका आहे.
इंग्लंडचा दुसरा फलंदाज माघारी, मलान 14 धावांवर बाद होऊन परतला. राहुल चाहरने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक विकेट घेतला. इंग्लंडने 60 धावांवर आपले दोन विकेट गमावले आहेत.
सुंदरच्या ओव्हरमध्ये इंग्लंडने 17 धावा केल्या. इंग्लंडची सुरुवात संथ झाली असली तरी आता इंग्लंडचे फलंदाज हळूहळू कमबॅक करत आहेत. 6 ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोअर एक विकेट गमावत 48 धावा इतका आहे. जेसन रॉय 33 धावांवर खेळत आहे.
इंग्लंडने चार ओव्हरमध्ये एक विकेट गमावत 28 धावा केल्या आहेत. जेसन रॉयने 16 तर मलानने नुकतंच आपलं खातं खोललं आहे. इंग्लंडला 16 ओव्हर्समध्ये 158 धावांची गरज आहे.
इंग्लंडने तिसऱ्या ओव्हरमध्ये भुवीने नमवलं. भुवीने आपल्या शानदार गोलंदाजीने बटलरला माघारी धाडलं. 15 धावांवर इंग्लंडचा पहिला फलंदाज बाद झाला. बटलरने 9 धावा केल्या.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या ट्वेण्टी-20 सामन्यात भारताचा डाव आटोपला. निर्धारित 20 षटकात भारताच्या 8 बाद 185 धावा. भारताचं इंग्लंडसमोर 186 धावांचं आव्हान
37 धावा करुन श्रेयस अय्यर माघारी परतला. 19.1 षटकात भारताच्या 7 बाद 174
हार्दिक पंड्या 11 धावांवर बाद, 18.5 षटकात भारताच्या 6 बाद 170 धावा
सूर्यकुमार यादवने षटकारासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. सूर्यकुमारने मागच्याच सामन्यात पदार्पण केले होते. पण त्याला फलंदाजीसाठी संधी मिळाली नाही. भारताने पाच षटकांत एका विकेटच्या जोरावर 34 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार 11 धावांवर खेळत आहे. तर राहुलने सात धावा केल्या आहेत.
भारताची पहिली विकेट पडली, रोहित शर्माकडून निराशा
इंग्लंडने दुसरी ओव्हर जोफ्रा आर्चरला दिली. आर्चरच्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या. दोन ओव्हरनंतर इंडियाचा स्कोअर 18 धावांवर. रोहित शर्मा 11 आणि केएल राहुल 7 धावांवर खेळत आहेत. मार्क वुड इंग्लंडकडून तिसरी ओव्हर टाकत आहे.
टीम इंडियाची शानदार सुरुवात. रोहित शर्माने रशीदने टाकलेला पहिला चेंडू टोलावत शानदार षटकार फटकावला. रशीदच्या पहिल्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल दोघांनी 11 धावांची खेळी केली.
रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची जोडी मैदानावर उतरली असून रोहित शर्मा स्ट्राइकवर आहे. मोईन अलीने पुन्हा एकदा रशीदवर विश्वास दाखवत त्याच्या हातात चेंडू सोपावला आहे.
England Playing 11: जोस बटलर (विकेटकीपर), जेसन रॉय, डेविड मलान, जॉनी बेयरस्टो, इयोन मोर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम कर्रन, आदिल रशीद, क्रिस जॉर्डन, मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर.
India Playing 11: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्याकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकुर
इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेचा चौथा सामना आज खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला सामना जिंकने गरजेचं आहे. तसेच आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यावर इंग्लंडची नजर असेल.
पार्श्वभूमी
IND vs ENG 4th T20 Live Score Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेचा चौथा सामना आज खेळवला जाणार आहे. आज सायंकाळी 7 वाजेपासून मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळला जाईल. सायंकाळी साडेसहा वाजता टॉस होईल. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे अहमदाबादमधील रिकाम्या स्टेडियममध्ये पुन्हा एकदा सामना खेळला जाईल.
पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील आव्हान काय राखण्यासाठी टीम इंडियाला सामना जिंकने गरजेचं आहे. तसेच आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यावर इंग्लंडची नजर असेल. विराट सेनेसाठी या सामन्यातील सर्वात मोठे आव्हान इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीच्या हल्ल्याशी सामना करणे आहे. याशिवाय सलामीवीर केएल राहुलचा खराब फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.
पराभवानंतर कोहलीकडून बदलाचे संकेत
तिसर्या टी -20 मध्ये इंग्लंडने भारताचा सहज पराभव केला. या पराभवानंतर भारतीय कर्णधारविराट कोहलीने चौथ्या टी -20 संघात बदलांचे संकेत दिले होते. कोहली म्हणाला की पुन्हा एकदा संघ निवडीबद्दल विचार करावा लागेल. खरं तर कोहली चौथ्या टी -20 मध्ये सहा गोलंदाजीच्या पर्यायांसह उतरण्याविषयी बोलत होता. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजी कामगिरीही चिंतेचा विषय आहे. आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आपली फॉर्मध्ये नाही. तिसर्या टी -20 सामन्यात युजवेंद्र महागडा गोलंदाज ठरला.
सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळला जाईल
अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा फैलाव होताना दिसत आहे. त्यामुळे हा सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळला जाईल. यापूर्वी तिसर्या टी -20 सामन्यातही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नव्हती. मात्र मालिकेचे पहिले दोन सामने प्रेक्षकांच्या निम्म्या उपस्थितीसह खेळले गेले. आत वाढत्या संक्रमणामुळे मालिकेचा शेवटचा आणि पाचवा टी -20 देखील प्रेक्षकांविना खेळवला जाणार आहे.
भारत संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
इंग्लंड संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, लिम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मालन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स , रीस टोपली आणि मार्क वुड.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -