Ishan Kishan : सध्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी 20 मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. दरम्यान या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील सरुवातीच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी 3 यष्टीरक्षक खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र 3 यष्टीरक्षक करुनही इशान किशनला संधी देण्यात आलेली नाही.


इशान किशनची निवड का झाली नाही? 


इशान किशला संधी का देण्यात आली नाही? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. इशान किशन आफ्रिका दौऱ्यावरुन परतला. त्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेसाठीही इशान किशनला डच्चू देण्यात आलाय. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इशानची निवड होईल, असे बोलले जात होते. मात्र, इंग्लंडविरुद्धही त्याला संधी देण्यात आलेली नाही. 


बीसीसीआयकडून इशानला किशनला शिक्षा?


इशान किशनची दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, इशान किशनने आफ्रिका दौरा निम्म्यातच सोडला होता. मानसिक दबाव असल्याने मला सुट्टी हवी असल्याचे इशानने म्हटले होते. शिवाय, कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यास माझ्यामध्ये सुधारणा होईल, असेही इशान म्हणाला होता. मात्र, आफ्रिका दौरा निम्म्यात सोडून परतल्यानंतर इशान मित्रांसमवेत पार्टी करताना दिसला. शिवाय एका टीव्ही शोमध्येही त्याने हजेरी लावली होती. त्यामुळे बीसीसीआयने इशानला शिक्षा दिली असल्याचे बोलले जात आहे. 


कोण आहेत संधी देण्यात आलेले 3 यष्टीरक्षक?  


महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 3 यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली. केएस भरत, केएल राहुल आणि ध्रुव जुरैल या तिघांना टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. मात्र, इशानला बीसीसीआयने डच्चू दिलाय. 


सुरुवातीच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडिया 


 रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरैल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान


कधी होणार मालिका 


पहिली कसोटी - हैदराबाद - 25 ते 29 जानेवारी 


दुसरी कसोटी - विशाखापट्टनम - 2 ते 6 फेब्रुवारी 


तिसरी कसोटी - राजकोट - 15 ते 19 फेब्रुवारी 


चौथी कसोटी - रांची - 23 ते 27 फेब्रुवारी 


पाचवी कसोटी - धर्मशाला - 7 ते 11 मार्च 


 






इतर महत्वाची बातमी 


IND vs ENG Test : ध्रुव जुरेलला टीम इंडियाचं तिकिट, इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड