INDvsENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर मालिकेचा तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मोटेराच्या या नव्या ऐतिहासिक स्टेडियमसह भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी हा सामना खूप खास आहे. इशांत मोटेराच्या मैदानावर त्याच्या कसोटी कारकिर्दीचा 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. महान भारतीय अष्टपैलू कपिल देव यांच्यानंतर 100 कसोटा सामना खेळणारा इशांत हा दुसरा वेगवान गोलंदाज असेल. इशांतने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत कसोटी क्रिकेटमधील 300 विकेट्सही पूर्ण केल्या.

Continues below advertisement

2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध पदार्पण

32 वर्षीय इशांतने 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात बांगलादेशविरूद्ध कसोटी कारकिर्दीची सुरूवात केली होती. आतापर्यंत खेळलेल्या 99 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 302 विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात 74 धावा देऊन 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. इशांतने कसोटी सामन्याच्या डावात 11 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, इशांतने आतापर्यंत एकच पिंक बॉल कसोटी सामना खेळला आहे. बांगलादेशविरूद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इशांतने शानदार गोलंदाजी केली आणि नऊ विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. त्याने या पिंक बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 22 बाद 5 आणि दुसर्‍या डावात 56 धावांत 4 बळी घेतले.

Continues below advertisement

Ind vs Eng, Motera Test: तिसऱ्या कसोटीसाठी मोटेरा स्टेडियम दोन खेळपट्ट्यांसह सज्ज, इंग्लंड संघाचा संभ्रम कायम

100 कसोटी खेळणारा बारावा भारतीय खेळाडू

इशांत शर्मा मोटेरा येथे होणारा तिसरा कसोटी सामन्यात भारतीय संघात सामील झाला तर तो त्याचा 100 वा कसोटी सामना असेल. याआधी 11 भारतीय खेळाडूंनी 100 कसोटी सामने खेळले आहेत.

  • सचिन तेंडुलकर (200)
  • राहुल द्रविड (163)
  • व्हीव्हीएस लक्ष्मण (134)
  • अनिल कुंबळे (132)
  • कपिल देव (131)
  • सुनील गावस्कर (125)
  • दिलीप वेंगसरकर (116)
  • सौरभ गांगुली (113)
  • वीरेंद्र सेहवाग (103)
  • हरभजन सिंग (103)
मोठा खुलासा! यशशिखरावर असणारा विराट एकटा पडतो तेव्हा....