बर्मिंघम :  भारताचा कॅप्टन शुभमन गिल यानं इतिहास रचला आहे. शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 धावा केल्या तर दुसऱ्या डावात शुभमन गिलनं शतक केलं आहे. शुभमन गिलनं कसोटी क्रिकेटमधील आठवं शतक केलं आहे. दुसऱ्या डावात एखाद्या राजासारखं शतक शुभमन गिलनं केलं आहे. यामुळं भारत बर्मिंघम कसोटीत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या डावात शिस्त दाखवली तर दुसऱ्या डावातील खेळीत शुभमन गिलनं आक्रमक फलंदाजी केली. त्यानं 129 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. 


भारत भक्कम स्थितीत


शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 धावा केल्यानं संघानं 587 धावा केल्या होत्या. त्या डावात यशस्वी जयस्वालनं 87 तर रवींद्र जडेजानं 89 धावा केल्या होत्या. या जोरावर भारतानं 587 धावा केल्या होत्या. मोहम्मद सिराज आणि आकाश दीपनं दमदार गोलंदाजी करत इंग्लंडला 407 धावांवर रोखलं. मोहम्मद सिराजनं 6 विकेट तर आकाश दीपनं 4 विकेट घेतल्या. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकनं 158 आणि जेमी स्थिथनं नाबाद 184 धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडनं 407 धावा केल्या.  सिराज आणि आकाशदीपच्या गोलंदाजीमुळं इंग्लंडचे सहा फलंदाज पहिल्या डावात खातं देखील उघडू शकले नाहीत.  भारताला पहिल्या डावातील 180 धावांची आघाडी मिळाली होती. 


भारताच्या दुसऱ्या डावात 300 धावा


भारतानं  तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली.  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 64 धावा केल्या होत्या. आज चौथ्या दिवशी दोन्ही सत्रावर वर्चस्व गाजवत भारतानं 300 धावांचा टप्पा पार केला आहे.  


शुभमन गिलच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता 17 शतकांची नोंद झाली आहे. शुभमन गिलनं कसोटीमध्ये 8 शतकं केली आहे. वनडेमध्ये देखील 8 शतकं त्याच्या नावावर आहेत. तर, टी 20 क्रिकेटमध्ये 1 शतक केलं आहे.


दुसऱ्या सत्राअखेर भारताकडे 484 धावांची आघाडी 


भारताला पहिल्या डावात 180 धावांची आघाडी मिळाली होती. तर, दुसऱ्या डावात भारतानं 4 बाद 304 धावा केल्या आहेत.  यामुळं भारताकडे 484  धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवसाच्या दोन्ही सत्रात भारतानं वर्चस्व गाजवलं.


भारत मालिकेत बरोबरी करणार? 


भारताला पहिल्या कसोटीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटीमध्ये विजय मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून भारत मालिकेत बरोबरी करणार का ते पाहावं लागेल. इंग्लंडकडे या कसोटीत विजय मिळवणे किंवा अनिर्णित ठेवण्यासाठी खेळणे हा देखील पर्याय आहे. भारताचे गोलंदाज इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 10 विकेट घेण्यात यशस्वी ठरतात का ते पाहावं लागेल.