IND vs ENG, 2nd ODI, The Lords Stadium: क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात पार पडणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा डाव 246 धावांवर आटोपला आहे. यावेळी भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, मात्र अखेरच्या काही षटकात मोईन अली आणि डेविड विली यांनी इंग्लंडचा डाव सावरल्याचं दिसून आलं. भारताकडून चहलने उत्तम प्रदर्शन करत महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या.
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असून आता दुसरा सामना भारत खेळत आहे. यावेळी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर इंग्लंडची सुरुवात काहीशी चांगली झाली, बेअरस्टो (38) आणि रॉय (28) जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी एक-एक करत इंग्लंडला झटके देण्यास सुरुवात केली.
विली-अलीची दमदार भागिदारी
पण अखेरच्या काही षटकांमध्ये मोईन अली आणि डेविड विली यांनी एक उत्तम भागिदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. यावेळी अलीने 47 तर विलीने 41 धावा केल्या. भारताकडून चहलने अप्रतिम गोलंदाजी करत 10 ओव्हरमध्ये 47 धावा देत महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. पांड्या-बुमराह यांनीही प्रत्येकी दोन तर शमीने आणि प्रसिध कृष्णाने एक-एक विकेट घेतली. आता भारताला 50 षटकाच 247 धावा करायच्या आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराह संघात नाही, कसा आहे संपूर्ण स्कॉड?
- India Tour of West Indies 2022: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?
- ENG vs IND, 2nd ODI, Pitch Report : क्रिकेटच्या पंढरीत रंगणार दुसरा एकदिवसीय सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर