INDvsENG : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. त्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळले जातील. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की या सामन्यादरम्यान प्रेक्षक स्टेडियममध्ये हजर राहणार नाहीत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा या खेळाडूंना स्वत: ला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.


पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ लवकरच चेन्नईला पोचणार आहे. त्यानंतर या संघाला एका आठवड्यासाठी क्वॉरंटाईन व्हाव लागणार आहे. यावेळी रणनीती बनवण्यास खेळाडूंना वेळ मिळेल. भारतीय संघाचा उत्साह सध्या जास्त आहे आणि आगामी मालिकेत त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. भारतीय संघ इंग्लंडला कमी लेखणार नाही आणि ऑस्ट्रेलियासारख्या चांगल्या रणनीतीवर काम करेल.


पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ


इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.


कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात


पहिला सामना: 5-9 फेब्रुवारी (चेन्नई)


दुसरा सामना: 13-17 फेब्रुवारी (चेन्नई)


तिसरा सामना: 24-28 फेब्रुवारी (अहमदाबाद)


चौथा सामना: 4-8 मार्च (अहमदाबाद)


टी -20 मालिकेचे सर्व सामने अहमदाबादमध्ये


भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी -20 मालिका देखील खेळणार आहे. सर्व सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. पहिला सामना 12 मार्च, दुसरा सामना 14 मार्च, तिसरा सामना 16 मार्च, चौथा सामना 18 मार्च आणि शेवटचा सामना 20 मार्चला होईल. सध्या टी -20 साठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे.


एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक


पहिला सामना: 23 मार्च (पुणे)


दुसरा सामना: 26 मार्च (पुणे)


तिसरा सामना: 28 मार्च (पुणे)