IND vs ENG 1st T20 : कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणारा भारतीय संघ टी 20 मालिकेसाठी तयार झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये गुरुवारपासून तीन सामन्याची टी 20 मालिका सुरु होत आहे. हा सामना रोज बाउल, साउथेम्प्टन (The Rose Bowl, Southampton) येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेदहा वाजता सुरु होणार आहे. टी 20 मालिकेपूर्वी भारतीय संघाने सराव केलाय. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, नियमीत कर्णधार रोहित शर्मा (ROHIT SHARMA) पुनरागमन करत आहे. साउथेम्प्टनचं मैदान आणि हवामान कसे असेल जाणून घेऊयात.. 


पिच रिपोर्ट - 
साउथेम्प्टनमधील रोज बाउल (The Rose Bowl, Southampton) मैदानावर आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ पाच वेळा जिंकलाय. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला चार वेळा विजय मिळलाय. या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या 168 इतकी आहे तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 143 इतकी आहे. रिपोर्ट्सनुसार, खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी स्विकारु शकतो. प्रथम फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असेल.  


हवामान कसे असेल?
येथील हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी सॉउथम्पटन (Southampton) पावासाची शक्यता कमी आहे. सात जुलै रोजी 46 टक्के ढग येण्याची शक्यता आहे. तर 39 प्रित तास वेगाने हवा वाहणार आहे. येथील कमाल तापमान 24 डिग्री सेल्सियस आणि किमान 12 डिग्री सेल्सियस असेल. 


प्रतिस्पर्धी संघ कसे आहेत?
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, ईशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक, युजवेंद्र चहल.


इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), डेविड मलान, हॅरी ब्रूक, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, फील सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, मॅट पार्किंसन, रीस टोप्ले, रिचर्ड ग्लीसन, तयमल मिल्स.