Team India Win : ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) संयमी खेळीमुळे टीम इंडियाने बांगलादेशच्या मुठीतून विजय हिसकावून घेत सामना आणि मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील (India vs Bangladesh test Series) या विजयानंतर टीम इंडियाने (Team India) एक मोठा विक्रम केला आहे. भारताने या विजयासोबत आशियामध्ये सलग 18 वी कसोटी मालिका जिंकली आहे.


आशियामध्ये सलग 18 वा कसोटी मालिका विजय


बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करण्यासोबतच भारतीय संघाने आशिया खंडात सलग 18व्या कसोटी मालिकेत विजयाची नोंद केली आहे. 2012-13 मध्ये भारताला आशियामध्ये इंग्लंडकडून (IND vs ENG Test) शेवटचा पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी टीम इंडियाला देशांतर्गत कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून टीम इंडियाने आशियामध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि सलग 18 व्या मालिका विजयाची नोंद करण्यात यश मिळवले आहे.


विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातील विजयासह भारताने 2000 सालापासून आतापर्यंतचा मोठा विक्रम कायम ठेवला आहे. टीम इंडियाने आजपर्यंत बांगलादेशविरुद्ध एकही कसोटी सामना गमावलेला नाही. 2015 मध्ये बांगलादेशला भारतासोबतचा सामना ड्रॉ करण्यात यश आले होते, मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाला नव्हता. दुसरीकडे, गेल्या 13 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत, तर दोन संघांमधील दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.


कसोटी मालिका 2-0 ने जिंकली


भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकत भारताने क्लिन स्वीप दिला आहे. यावेएळी पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तर दुसरा सामना फारच अटीतटीचा झाला. भारताला शेवटच्या डावात 145 धावांचे माफक लक्ष्य असतानाही 7 गडी गमावून भारत जिंकला आणि तीन विकेट्च्या फरकाने सामना जिंकत भारताने मालिका जिंकली.


हे देखील वाचा-