IND vs SL, T20 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका (IND vs SL) 3 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होणार आहे. दरम्यान त्यापूर्वी समोर येणाऱ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित या मालिकेसाठी अनफिट आहे, अशा परिस्थितीत केएल राहुल नाही तर हार्दिक पांड्याकडे टीमची कमान सोपवली जाऊ शकते. केएल राहुल या संघातही नसल्याचं समोर येत आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, "श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी रोहित शर्माची बोटाची दुखापत बरी होईल असे सध्या तरी दिसत नाही." अशा परिस्थितीत हार्दिक संघाचे नेतृत्व करेल. केएल राहुलचा विचार केला तर टी20 संघात तो अधिक काळ नसेल असेच दिसून येत आहे. टी-20 विश्वचषकानंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. मात्र, अजूनपर्यंत नवीन निवड समिती स्थापन न झाल्याने जुनी समितीच आगामी मालिकेसाठी संघ जाहीर करणार आहे, असंही या सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आलं.
केएल राहुल सुट्टीवर?
केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत तो सात फेरे घेणार आहे. दोघेही जानेवारीतच लग्न करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, रोहित अनफिट झाल्यास, हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेची जबाबदारी स्वीकारू शकतो आणि राहुलला सुट्टीवर जाऊ शकतो.
खराब फॉर्मशी झुंजतोय केएल
आयपीएल 2022 (IPL 2022) नंतर केएल राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला तेव्हापासून तो खास फॉर्मात दिसत नाही. त्याच्या बॅटमधून काही वेळाच चांगल्या धावा झाल्या आहेत. गेल्या 6 टी-20 डावांमध्ये त्याचा स्कोअर 5, 51, 50, 9, 9, 4 आहे. केएल राहुलने झळकावलेली शेवटची दोन अर्धशतके झिम्बाब्वे आणि बांगलादेश या कमकुवत संघांविरुद्ध आहेत. त्यामुळं टी20 संघात त्याची जागा जवळपास गेल्याचं दिसून येत आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला एकदिवसीय सामना | 3 जानेवारी | वानखेडे स्टेडियम, मुंबई | सायंकाळी 7 वाजता |
दुसरा एकदिवसीय सामना | 5 जानेवारी | एमसीए स्टेडियम, पुणे | सायंकाळी 7 वाजता |
तिसरा एकदिवसीय सामना | 7 जानेवारी | सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट | सायंकाळी 7 वाजता |
टी20 मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला टी20 सामना | 10 जानेवारी | बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी | दुपारी 2 वाजता |
दुसरा टी20 सामना | 12 जानेवारी | ईडन गार्डन्स, कोलकाता | दुपारी 2 वाजता |
तिसरा टी20 सामना | 15 जानेवारी |
ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम |
दुपारी 2 वाजता |
हे देखील वाचा-