ICC T20 World Cup 2024: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T20 World Cup 2024) स्पर्धा सुरु होण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. स्थानिक वेळेनुसार आज या स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. तथापि, भारतीय वेळेनुसार, 2024 टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना उद्या सकाळी 6 वाजता होणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) सर्व संघांना इशारा दिला आहे.


टी-20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या संघांविरुद्ध नेपाळ आणि नेदरलँड्स आश्चर्यकारक निकाल देऊ शकतात, असं ॲडम गिलख्रिस्टने सांगितले. तसेच  बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसह नेपाळ आणि नेदरलँड्सला ड गटात ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्यामुळे नेपाळचा संघ अधिक मजबूत झाला आहे, असे गिलख्रिस्टचे मत आहे.


ॲडम गिलख्रिस्ट नेमकं काय म्हणाला?


ॲडम गिलख्रिस्टने रेडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझा विश्वास आहे की नेपाळ हा संघ चांगली कामगिरी करू शकतो. त्यांच्याकडे असे काही खेळाडू आहेत जे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या लीगमध्ये सातत्याने खेळत आहेत. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच स्टार लेगस्पिनर संदीप लामिछानेला अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने नेपाळला मोठा धक्का बसला आहे, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.


नेदरलँड्सने दक्षिण अफ्रिकेचा केला होता पराभव-


2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्स संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अस्वस्थता निर्माण केली होती आणि गिलख्रिस्टचा असा विश्वास आहे की या संघाला पराभूत करणे सोपे नाही. नेदरलँड्स संघ नेहमीच आव्हान सादर करतो आणि ते पुन्हा त्याच गटात आहेत ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका आहे. गेल्या विश्वचषकात त्यांनी ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता आणि यावेळीही ते एक आव्हान निर्माण करू शकतात, असं ॲडम गिलख्रिस्टने सांगितले.


टी20 विश्वचषकासाठी नेपाळ संघ:


रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग आयरी, आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल मल्ला, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमलसिंग आयरी.


नेदरलँडचा संपूर्ण संघ-


स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), आर्यन दत्त, बास डी लीडे, काइल क्लेन, लोगन व्हॅन बीक, मॅक्स ओडॉड, मायकेल लेविट, पॉल व्हॅन मीकरेन, साकिब झुल्फिकार, सिब्रांड एंजलब्रेक्ट, तेजा निदामनुरु, टिम प्रिंगल, विक्रम सिंग, विव किंग्मा, वेस्टी बॅरेसी.


मोफत पाहता येणार टी-20 विश्वचषकाचा थरार-


वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं मोफत प्रसारन मोबाईलवर पाहाता येणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी20 विश्वचषकात भारतीयांना मोफत पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टी20 विश्वचषक 2024 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे.  2023 वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते. 


संबंधित बातमी:


ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकातील 20 संघाचा Full Squad अन् संपूर्ण वेळापत्रक, सामने कुठे बघाल? पाहा एका क्लिकवर