IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला गेला. या सामन्यात भारताला बांगलादेशकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलंय. दरम्यान, बांगलादेशच्या डावादरम्यान भारतीय संघाचा विकेटकिपर केएल राहुलनं (KL Rahul) महमुदुल्लाहचा (Mahmudullah) जबरदस्त झेल पकडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होतोय. 


बांगलादेशच्या डावात भारतीय यष्टीरक्षक केएल राहुलनं महमुदल्लाहचा अप्रतिम झेल टिपला. उमरान मलिकच्या चेंडूवर त्यानं महमुदल्लाहचा हा झेल घेतला. केएल राहुलचा हा जबरदस्त झेल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्स सातत्यानं कमेंट करून केएल राहुलच्या झेलचे कौतुक करत आहेत. या सामन्यात महमुदुल्लाहनं 77 धावांची उत्कृष्ट खेळी केली. महत्वाचं म्हणजे, प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघानं अवघ्या 69 धावांवर 6 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर महमुदुल्लाह आणि मेहंदी हसन मिराजनं महत्त्वपूर्ण 148 धावांची भागिदारी रचत बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं.


व्हिडिओ-






 


 महमुदुल्लाह आणि मेहंदी हसनची महत्त्वपूर्ण भागिदारी
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात झाली. बांगलादेशच्या संघानं दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. मोहम्मद सिराजनं अनामुल हकला एलबीडब्लू करून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. पावर प्लेमध्ये बांगलादेशच्या संघानं दोन विकेट गमावून 44 धावा केल्या. उमरान मलिकनं त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात शांतोला क्लीन बोल्ड करून बांगलादेशच्या संघाला तिसरा धक्का दिला. सुंदर वॉशिंग्टन सुंदरनं शाकीब हल हसनला झेल बाद केलं. शाकीब अल हसनला 20 चेंडूत 8 धावा करत्या आल्या. बांगलादेशच्या डावातील 19 व्या षटकात वॉशिंग्टननं रहीम (12 धावा) आणि अफीफच्या (0 धाव) रुपात बांगलादेशच्या दोन फलंदाजाला माघारी धाडलं. तर, उमरान मलिकनं महमूदुल्लाहला आऊट करून भारताला सातवं यश मिळवून दिलं. पण एका बाजूनं विकेट पडत असताना महेंदी हसननं  नाबाद 100 धावा) संघाचा डाव सावरला आणि बांगलादेशच्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं.


भारताचा पाच धावांनी पराभव
महेंदी हसन शतकी आणि महमूदुल्लाहच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशच्या संघानं निर्धारित 50 षटकात सात विकेट्स गमावून  भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 50 षटकांत 266 धावापर्यंतच मजल मारू शकला. भारतानं हा सामना पाच धावांनी गमावला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. 


हे देखील वाचा-