IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतानं अवघ्या 48 धावांवर तीन विके्टस गमावल्या. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही (Virat Kohli) काही खास कामगिरी करू शकला नाही.या सामन्यात भारतासाठी तारणहार ठरलेला ऋषभ पंतही (Rishabh Pant) 46 धावा करून माघारी परतला.अवघ्या चार धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं. या खेळीच्या जोरावर ऋषभ पंतनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. याशिवाय त्यानं कसोटी क्रिकेटमधील षटकारांचं अर्धशतक पूर्ण केलंय.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीयाकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा माजी क्रिकेटपटू विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्यानं 104 कसोटी सामन्यांमध्ये 91 षटकार मारले.त्यानंतर माजी कर्णधार एमएस धोनीनं 90 कसोटीत 78 षटकार ठोकले आहेत. तसेच सचिन तेंडुलकर 200 कसोटीत 69, रोहित शर्मा 45 कसोटीत 64, कपिल देव 131 कसोटीत 61, सौरव गांगुली 113 कसोटीत 57, रवींद्र जडेजा 60 कसोटीत 55 षटकार मारले आहेत. या यादीत ऋषभ पंतचाही समावेश झालाय.त्यानं त्याच्या कारकिर्दीतील 32 कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 50 षटकारांचा टप्पा गाठलाय. 
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार:

क्रमांक फलंदाजांचं नाव सामने षटकार
1 वीरेंद्र सेहवाग 104 91
2 महेंद्रसिंह धोनी 90 78
3 सचिन तेंडुलकर 200 69
4 रोहित शर्मा 45 64
5 कपिल देव 131 61
6 सौरव गांगुली 113 57
7 रवींद्र जाडेजा 60 55
8 ऋषभ पंत 32 50

हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 11 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी 9 सामन्यात भारतानं जिंकले आहेत. तर, फक्त एका सामन्यात बांगलादेशच्या संघाला विजय मिळवता आलाय. भारत आणि बांगलादेश यांच्यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. 

संघ-

बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन:
झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, इबादोत हुसेन.

भारताची प्लेईंग इलेव्हन:
शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

हे देखील वाचा-