Arjun Tendulkar Century: क्रिकेट जगतात ज्याला देव समजलं जातं अशा सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एकापेक्षा एक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आता त्याचा मुलगा 23 वर्षीय अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एक दमदार रेकॉर्ड नावावर केला आहे. अर्जुननं रणजी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच गोवा संघाकडून खेळत राजस्थान विरुद्ध शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनेही 34 वर्षांपूर्वी डिसेंबर 1988 मध्ये रणजी सामन्यात गुजरातविरुद्ध शतक ठोकलं होतं. अर्जुन यानेही वडिलांप्रमाणे सलामीच्या रणजी सामन्यात शतक 
ठोकून आपण आलो आहोत असा डंकाच क्रिकेट विश्वात वाजवला आहे.


पण सचिन आणि अर्जून यांच्या शतक ठोकण्यामध्ये फरक म्हणाल तर सचिननं 15 वर्षाच्या वयात शतक ठोकलं होतं, तर अर्जुन याने 23 वर्षाच्या वयात ही कामगिरी केली आहे. पण आतापर्यंत केवळ सचिनचा मुलगा इतकीच ओळख असलेल्या अर्जुनने सलामीच्या रणजी सामन्यात शतक ठोकत आपली एक वेगळी ओळक नक्कीच निर्माण केली आहे.


एमसीएकडून NOC नंतर अर्जूनचं पदार्पण


मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) अर्जुन तेंडुलकरला राज्य बदलण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते. याबाबत गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिन विपुल फडके यांनी माहिती देताना सांगितले की,, अर्जुन तेंडुलकरला आगामी हंगामात गोव्याकडून खेळायचे होते. त्यासाठी त्यांने संपर्क साधला. आम्ही यावर उत्तर देत आधी एमसीएकडून एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र द्या ज्यानंतर आम्ही तुमचे कौशल्य आणि फिटनेस तपासू, अशी माहिती फडके यांनी दिली. ज्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यावर अखेर अर्जूननं गोवा संघात पदार्पण केलं.  


राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय


गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान गोव्याची सुरुवात मात्र चांगली झालेली नाही. त्यांनी अवघ्या 32 धावांवर पहिली विकेट गमावली. सलामीवीर सुमिरन आमोणकर 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर अमोघ देसाईने 27 धावा केल्या. सिद्धेश लाड 17 आणि एकनाथ केरकरने 3 धावा केल्या. त्याचवेळी स्नेहल कौथुणकरने 59 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गोव्याने 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी सुयश प्रभुदेसाई आणि अर्जुननं संघाचा डाव सावरत शतकं पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी चहापाणापर्यंत सुयश 172 तर अर्जुन 112 धावांवर खेळत आहे. संघाची स्थिती पाहिल्यात 410 वर 5 बाद अशी आहे.


हे देखील वाचा-