IND vs BAN 3rd ODI: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) बांगलादेशविरुद्धच्या (India vs Bangladesh 3rd ODI) अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 113 धावांची खेळी करत शतकांचा दुष्काळ संपवलाय. विराटनं ऑगस्ट 2019 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचं शतक ठोकलं होतं. त्यानंतर तब्बल 1 हजार 214 दिवसानंतर विराटच्या बॅटमधून शतक पाहायला मिळालंय. सोशल मीडियावर विराटच्या फलंदाजीचं कौतूक केलं जातंय.
ट्वीट-
ट्वीट-
विराटचा फॉर्म परतला
विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटच्या 25 डावानंतर शतक झळकावलंय. विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 72वं शतक ठरलं आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. नुकताच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीनं पहिलं टी-20 शतकं झळकावून आंतराष्ट्रीट क्रिकेटमधील जवळपास तीन वर्षांचा दुष्काळ संपवला. याशिवाय, टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरलाय.
रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला
विराट कोहलीनं 2019च्या ऑगस्ट महिन्यात अखेरचं एकदिवसीय शतक केलं होतं. जेव्हा भारतानं एकदिवसीय विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून विराटनं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगला मागं टाकलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिकी पाँटिंगच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे.
बांगलादेशमध्ये 1000 एकदिवसीय धावा
विराट कोहलीनं बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी करत खास विक्रमाला गवसणी घातलीय. , कोहलीने बांगलादेशमध्ये 1000 एकदिवसीय धावांचा टप्पा गाठला, असे करणारा दुसरा खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियन शेन वॉटसनला मागे टाकलं.
हे देखील वाचा-