India vs Bangladesh Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दौऱ्यात एकदिवसीय सामने आणि कसोटी सामने भारत खेळत आहे. या दौऱ्यातील तीन एकदिवसीय सामन्यांपैकी अखेरचा सामना आज रंगणार आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. ज्यानंतर दुसरा सामना भारताने 5 धावांनी गमावला. विशेष म्हणजे दोन्ही सामने अगदी रोमहर्षक झाले. पण दोन्ही सामन्यात भारत थोडक्यात पराभूत झाला. दरम्यान आता अखेरचा सामना भारताने गमावल्यास भारताला व्हाईट वॉश मिळू शकतो. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारत करेल. तर हा तिसरा एकदिवसी सामना खेळवला जाणार आहे. तर या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...


कधी होणार सामना?


भारत विरुद्ध बांगलादेश हा तिसरा एकदिवसीय सामना आज अर्थात 10 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 


कुठे आहे सामना?


हा भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा एकदिवसीय सामना बांगलादेशच्या  चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


भारताचा एकदिवसीय संघ: 


केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.



बांगलादेश एकदिवसीय संघ:


लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद.





हे देखील वाचा-