India vs Bangladesh 1st Test Live : भारताविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने शानदार सुरुवात केली आहे. चेन्नई येथे गुरुवारी झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या 24 वर्षीय युवा वेगवान गोलंदाजाने भारताच्या टॉप ऑर्डरला चांगलाच रडवलं. प्रथम रोहित शर्माची विकेट घेतल्यानंतर महमूदने शुभमन गिललाही आपला शिकार बनवले. एकापाठोपाठ दोन विकेट्स गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. त्यावेळी फलंदाज विराट कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या. पण त्यानेही महमूदसमोर नांग्या टाकल्या.
पहिल्या एक तासात उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हसन महमूदने 10 षटकात 3 विकेट घेत हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतले. दरम्यान सोशल मीडियावर ऋषभ पंत आणि लिटन दास यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होते आहे.
झाले असे की, ऋषभ पंत व यशस्वी जैस्वाल भारताचा डाव सावरत होते. यादरम्यान, 633 दिवसानंतर कसोटी खेळणाऱ्या ऋषभ पंतसोबत बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दासची शाब्दिक बाचाबाची झाली. लिटन दासने चेंडू त्याच्या दिशेने फेकल्याने ऋषभ पंत भडकला. जोमध्ये ऋषभ पंत म्हणाला की, उसको फेको ना भाई मुझे क्यू मार रहे हो... ज्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन -
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश संघ - शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.