India tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात बांगलादेश संघानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली. पण मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि लिटन दास (Liton Das) यांच्यातील वादानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 


गुरुवारी बांगलादेशचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना सिराज आणि लिटन दास एकमेकांशी भिडले. 14व्या षटकात सिराज गोलंदाजीसाठी आला आणि त्यानं एक शानदार चेंडू टाकला, त्यावर लिटननं बचावात्मक शॉट मारला. यानंतर सिराज लिटनच्या जवळ आला आणि त्याला काहीतरी म्हणाला. लिटननंही त्याला ऐकलं नाही, पुन्हा बोल असं उद्गार काढत तो अर्ध्या क्रीजपर्यंत पोहोचला. त्यावेळी मैदानातील अंपायरनं मध्यस्ती करत लिटन दासला माघारी पाठवलं. यानंतर पुढच्याच चेंडूवर सिराजनं इन-स्विंगर टाकून लिटन दासला क्लीन बोल्ड केला. यावर सिराजनं मोठ्यानं हसून लिटनची छेड काढली. एवढेच नाही तर विराट कोहलीही लिटन दासची खिल्ली उडवतानाही दिसला. लिटननं सिराजच्या वेळी जसा कानाला हात लावला होता, त्याच पद्धतीनं कोहलीनं स्वत:च्या कानावर हात ठेवला. मात्र, लिटन काहीच बोलला नाही आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला. 


ट्वीट-






 


भारताचं बांगलादेशसमोर 513 धावांचं आव्हान
दरम्यान, 254 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात दोन विकेट्स गमावून 258 धावा केल्या. भारताच्या दुसऱ्या डावात केएल राहुल आणि शुभमन गिल सलामीसाठी मैदानात आले. पण यंदाही केएल राहुल (23 धावा) स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर शुभमन गिल (110 धावा) आणि चेतेश्वर पुजारानं (102 धावा) जबरदस्त फलंदाजी करत भारताची धावसंख्या 500 पार पोहचवण्यास मदत केली. बांगलादेशकडून मेहंदी हसन आणि खालीद अहमद यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.


बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन:
झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, इबादोत हुसेन.


भारताची प्लेईंग इलेव्हन:
शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.


हे देखील वाचा-