Azhar Ali Announces International Retirement: पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अलीनं (Azhar Ali) शुक्रवारी पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.  इंग्लंडविरुद्ध कराची येथे खेळला जाणारा तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल, अशीही माहिती त्यानं दिली.


पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अलीनं निवृत्तीचा घोषणा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. निवृत्तीची घोषणा करताना अझहर म्हणाला की, आपल्या देशासाठी सर्वोच्च स्तरावर खेळणं ही माझ्यासाठी सन्मानजनक गोष्ट आहे. कोणत्या दिवशी निवृत्त होणार हे सांगणं फार कठीण आहे. पण सखोल विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की, माझ्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे."


ट्वीट-






 


अझहर अलीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
अझहर अलीनं पाकिस्तान संघासाठी 96 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं 42.5 च्या सरासरीनं 7 हजार 97 धावा केल्या आहेत. अझहरनं कसोटीत 19 शतकं आणि 35 अर्धशतकं केली. त्याचबरोबर त्यानं तीन वेळा कसोटी सामन्यात द्विशतक ठोकलं. अझहरनं पाकिस्तानसाठी एकदा त्रिशतकही झळकावलं आहे. याशिवाय, अझहरनं 53 एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यात त्यानं तीन शतकं 12 अर्धशतकांच्या मदतीनं 1 हजार 845 धावा केल्या आहेत. 


मालिकेत पाकिस्तानचा संघ 2-0 नं पिछाडीवर
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड संघानं शानदार कामगिरी करत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाने पाकिस्तानला दोन्ही सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही आणि या मालिकेतील दोन्ही सामने जिंकले. आता तिसर्‍या कसोटी सामन्यात एकीकडे इंग्लंड पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानात क्लीन स्वीप करून इतिहास रचण्याच्या इराद्याने उतरेल, तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकून व्हाईट वॉश मिळण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडनं मालिकेतील पहिला सामना 74 धावांनी तर दुसरा 26 धावांनी जिंकला.


हे देखील वाचा-