India vs Bangladesh 1st T20I : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने एकूण 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी सात जिंकले आहेत. गेल्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला होता.
सर्वांच्या नजरा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादववर असतील. आयपीएल दरम्यान मयंक यादवमे सतत 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. मयंकशिवाय अष्टपैलू नितीश कुमारने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पदार्पण केले आहे.
बांगलादेशविरुद्ध भारताचा वरचष्मा
जेव्हा-जेव्हा भारत आणि बांगलादेशचे संघ टी-20 मालिकेत आमनेसामने आले आहेत, तेव्हा भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना 6 जून 2009 रोजी नॉटिंगहॅम येथे खेळला गेला. शेवटचा सामना 22 जून 2024 रोजी नॉर्थ साउंडमध्ये झाला.
गेल्या 15 वर्षांत दोन्ही देशांदरम्यान 14 टी-20 सामने झाले आहेत. या काळात बांगलादेश संघाला फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे. हा सामना 3 नोव्हेंबर 2019 रोजी दिल्लीत खेळला गेला. गेल्या 5 टी-20 सामन्यांमधील स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, या कालावधीत केवळ भारतानेच विजय मिळवला आहे.
भारतीय संघ प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.
बांगलादेश संघ प्लेइंग-11 : लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.
हे ही वाचा -