IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या थरारक सामन्यात भारताला एका विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. मेहंदी हसन (Mehndi Hasan) आणि मुस्तफिजून रहमाननं (Mustafizur Rehman) भारताच्या तोंडातून विजयी घास हिसकावून बांगलादेशला विजय मिळवून दिला. तसेच दहाव्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागिदारी करत खास विक्रमाला गवसणी घातली.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ढाकाच्या श्री बांगला नॅशनल स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमाननं दहाव्या विकेट्ससाठी 51 धावांची विजयी भागिदारी केली. बांगलादेशकडून भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहाव्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी 2003 मध्ये बांगलादेशनं भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात दहाव्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी केली होती.
ट्वीट-
मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमानची महत्वपूर्ण भागीदारी
भारताला 187 धावांवर रोखल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघाचीही दमछाक झाली. बांगलादेशनं 136 धावांवर नऊ विकेट्स गमावल्या.मात्र, मेहंदी हसननं संघाचा डाव सावरत संघाला विजयापर्यंत पोहचवलं.हसन महमूद बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मुस्तफिजुर रहमाननं मेहंदी हसनला चांगली साथ दिली. त्यानं 11 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीनं 10 धावा केल्या. तर, मेहंदीनं नाबाद 38 धावांची खेळी केली. मेहदी हसन आणि मुस्तफिझूर यांनी दहाव्या विकेटसाठी 51 धावांची विजयी भागीदारी केली. दोघांनीही भारतीय गोलंदाजांना एकही संधी दिली नाही.
भारत 1-0 नं पिछाडीवर
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूनं लागला. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसननं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. भारतीय संघ निर्धारित 50 षटकात 186 धावांवर ऑलआऊट झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाचीही दमछाक झाली. मोहम्मद सिराज, कुलदीप सेनच्या भेदक माऱ्यापुढं बांगलादेशच्या संघानं गुडघे टेकले. बांगलादेशनं 136 धावांवर हसन महमूदच्या रुपात नववी विकेट गमावली. परंतु, मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमानची महत्वपूर्ण भागिदारी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-