Prime Minister's XI vs India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. या मालिकेत भारतीय संघ सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. पुढचा सामना ॲडलेडमध्ये होणार आहे. हा सामना डे-नाईटच्या स्वरूपात पिंक बॉलने खेळवला जाईल. या सामन्यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. पिंक बॉल कसोटीत आपली पकड मजबूत करण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळला. जिथे भारतीय संघाने मिनिस्टर इलेव्हनचा एकतर्फी पराभव केला. टीम इंडियाने हा सामना 6 विकेटने जिंकला.
भारत विरुद्ध मिनिस्टर इलेव्हन यांच्यातील सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी काही नवीन नियमांसह सामना खेळवण्यात आला. जिथे दोन्ही संघांना 46-46 षटकांची फलंदाजी करण्याची संधी मिळाली. जो संघ सर्वाधिक धावा करतो तो जिंकतो. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पंतप्रधान इलेव्हन संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांचा संघ 43.2 षटकात 240 धावांवर सर्वबाद झाला.
यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. टीम इंडियाने 46 षटकांत फलंदाजी करत 5 गडी गमावून 257 धावा केल्या. भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त होती. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले. यासह भारताने या सामन्यानंतर ट्रॉफीही जिंकली. टीम इंडिया 06 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉल टेस्ट मॅच खेळणार आहे.
टीम इंडियाच्या विजयात दोन खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे दोन खेळाडू दुसरे कोणी नसून शुभमन गिल आणि हर्षित राणा आहेत. या दोन्ही खेळाडूंनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्या डावात हर्षित राणाची गोलंदाजी अप्रतिम होती. सामन्याच्या पहिल्या डावात राणाने 6 षटकात 44 धावा देत 4 बळी घेतले. यानंतर शुबमनने सामन्याच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. या सामन्यात गिलने 62 चेंडूत 50 धावा केल्या. दुसरीकडे जैस्वालनेही 45 धावांची खेळी केली. 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात या खेळाडूंकडून खूप अपेक्षा असतील.
हे ही वाचा -