IND vs AUS: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia Tour Of India) भारतात दाखल झालाय. येत्या 20 सप्टेंबरला या मालिकेतील पहिला सामना मोहाली (Mohali) येथे खेळला जाणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) दृष्टीनं ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची ठरणार आहे. दरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) पुन्हा फॉर्ममध्ये परतलाय. आशिया चषकात दमदार फलंदाजी करत त्याची सर्वोत्तम खेळाडूच्या यादीत गणना का केली जाते? हे दाखवून दिलं. विराट कोहली फॉर्ममध्ये परतल्यानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या मनात भिती निर्माण झालीय. तर, भारताचा कर्णधार रोहित शर्माचंही (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगलं कामगिरी करून दाखवलीय. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्यानंतर भारताचा सलामीवीर शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर रोहित शर्मा तिसऱ्या, महेंद्र सिंह धोनी चौथ्या आणि युवराज सिंह पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या तुलनेत विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय फलंदाजांची कामगिरी
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18 डावांमध्ये 146.23 च्या स्ट्राइक रेट आणि 59.83 च्या सरासरीनं 718 धावा केल्या आहेत. धवननं 13 डावात 139.35 च्या स्ट्राईक रेट आणि 28.91 च्या सरासरीनं 347 धावा केल्या आहेत. तर, रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 डावात 133.61 च्या स्ट्राइक रेट आणि 22.71 च्या सरासरीने 318 धावा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

क्रमांक फलंदाज डाव धावा
1 विराट कोहली 18 718
2 शिखर धवन 13 347
3 रोहित शर्मा 16 318

 

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ:
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.

हे देखील वाचा-