IND vs AUS, Playing 11 for 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आहे. दरम्यान या सामन्यात दोन्ही संघाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करण्यात आले आहेत. भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पहिल्या सामन्यात अनफिट असल्यामुळे संघात नव्हता. पण दुसऱ्या सामन्यापूर्वीच तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आणि संघासोबत सामिल झाला होता. ज्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात त्याला अंतिम 11 मध्ये संधी दिली गेली आहे. त्याच्या जागी मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादव याला विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघातही काही बदल करण्यात आले आहे. त्यांनी मॅट रॅनशॉ याला विश्रांती देत ट्रॅव्हिस हेड याला मैदानात उतरवलं आहे. तसंच मॅथ्यू कुहनेमन हा युवा देखील आज पदार्पण करत असून स्कॉट बोलांडच्या जागी त्याला संघात घेण्यात आलं आहे. तर  नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे ते पाहूया...


भारतीय संघाची प्लेईंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज


ऑस्ट्रेलिया संघाची प्लेईंग 11 : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन




सलामीच्या सामन्यात भारताचा दमदार विजय


नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs Australia 1st Test) भारताने एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली. भारताने हा सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. 


दिल्लीत टीम इंडियाचाच दबदबा 


1987 पासून भारताने दिल्लीत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. दिल्लीत खेळल्या गेलेल्या 34 पैकी 13 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर फक्त सहा गमावले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दिल्लीत एकूण 7 कसोटी सामने खेळला आहे. 1959 पासून कागारुंचा संघ विजयाची वाट पाहत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 2013 साली दिल्लीत खेळला गेला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 8 विकेट्सनी कांगारुंचा पराभव केला होता. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 14 बळी घेत टीम इंडियासाठी मोठ्या विजयाचा पाया रचला होता. 


हे देखील वाचा-