IND vs AUS : भारतीय क्रिकेट संघ यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ प्रॅक्टिस करत आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघाने पिंक आणि लाल चेंडूच्या सहाय्याने सराव सुरु केला आहे. या ट्रेनिंग सेशनमध्ये वनडे, टी20 आणि कसोटी संघात सहभागी असणाऱ्या सर्व फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सराव केला. कर्णधार विराट कोहलीने या प्रॅक्टिस सेशनचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता.
कोहलीने ट्विटरवर प्रॅक्टिस सेशनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये विराट मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर प्रॅक्टिस करताना दिसत आहे. विराटने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मला टेस्ट क्रिकेटसाठी प्रॅक्टिस करायला आवडंत.'
कोहलीव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI)नेही टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. BCCI च्या व्हिडीओमध्ये शमी आणि सिराज वेगवेगळ्या फलंदाजांसाठी गोलंदाजी करताना दिसत आहेत.
BCCI ने व्हिडीओ शेअर करताना लिहिलं होतं की, "गुरु आणि त्याचा शिष्य. जेव्हा मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने भारतीय संघासाठी प्रॅक्टिस दरम्यान एकत्र गोलंदाजी केली. वेगवान आणि अचूक."
दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबर रोजी पहिल्या एकदिवसीय सामन्याने होणार आहे. त्यानंतर 29 नोव्हेंबर रोजी दुसरा एकदिवसीय आणि 2 डिसेंबर रोजी तिसराएकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. तसेच 4 डिसेंबरपासून 8 डिसेंबर दरम्यान टी20 सीरीज खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 17 डिसेंबरपासून 19 जानेवरी दरम्यान चार कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :