India vs Australia 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. हा सामना 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्या याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्याने तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे रोहित शर्माही पहिल्या कसोटीतून बाहेर पडणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या अनुपस्थितीमध्ये सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलला संधी मिळू शकते. भारत तिसऱ्या क्रमांकावर अभिमन्यू इसवरनला संधी देऊ शकतो. अभिमन्यूला अद्याप पदार्पण करता आलेले नाही. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. जर आपण मधल्या फळीबद्दल बोललो तर ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल हे दोघेही प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. अष्टपैलू खेळाडूची भूमिका रवींद्र जडेजा करत असून तो अनुभवी आहे. त्यामुळे त्यांची जागाही जवळपास निश्चित आहे.
जसप्रीत बुमराह कर्णधार?
वेगवान गोलंदाज जसप्रीत हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत तो टीम इंडियाचा कर्णधार असेल. रोहित शर्मा पर्थ कसोटीत खेळला नाही तर टीम इंडियाची कमान जसप्रीत बुमराहच्या हाती असेल. जसप्रीत बुमराहसोबतच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजलाही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. टीम इंडिया आकाश दीपचाही विचार करू शकते.
पर्थ कसोटीसाठी भारताची संभाव्य Playing XI: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू इसवरन, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा/वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.