Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहितची पत्नी रितिका सजदेहने 15 नोव्हेंबर (शुक्रवारी) मुलाला जन्म दिला.
रोहित शर्माने वडील झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रोहितने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे, फॅमिली... ज्यामध्ये आपण चौघे आहोत.
रोहित शर्मालाही एक मुलगी आहे, तिचे नाव समायरा आहे.
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला पोहोचलेला नाही. त्यांच्याशिवाय उर्वरित भारतीय संघ आधीच दाखल झाला आहे.
दौऱ्यासाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.