Ind vs Aus:  भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना  भारताना अष्टपैलु खेळाडू रविंद्र जाडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली. रविंद्र वींद्र जडेजा आता पुढील सामने खेळू शकणार नाही. मिचेल स्टार्कने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू खेळताना डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे जडेजा चौथ्या कसोटी सामन्यामध्ये खेळू शकणार नाही आहे.


तिसर्‍या कसोटीमध्ये जडेजाने महत्वाची भूमिका बजावली होती. जडेजाने तिसर्‍या कसोटीत आपल्या जबरदस्त फिल्डिंगच्या जोरावर स्टीव्ह स्मिथला रनआऊट केले होते. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जडेजाने 4 विकेटही घेतल्या. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर रविंद्र जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. ही शस्त्रक्रीया यशस्वी झालीअसल्याची माहिती रविंद्र जाडेजाने ट्विट करत ही दिली आहे.


जडेजाने स्वत: चा एक फोटो शेअर करत आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, “दुखापतीमुळे थोडया काळासाठी क्रिकेटपासून दूर आहे. शस्त्रक्रीया यशस्वी पार पडली. लवकरच धमाकेदार पुनरागमन करेन”. जडेजाच्या या ट्विटवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहे.





In PICS | ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल नऊ भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त


रवींद्र जडेजाच्या दुखापतीबाबत बीसीसीआय म्हणते...


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) देखील या संदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत रवींद्र जडेजा चौथ्या कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘‘जडेजाला बरा होण्यासाठी 4 ते 6 आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही.  इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे सुरुवात होत आहे.


दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं आहे. एकापोठापाठ एक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त होत आहे. मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल राहुल, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजा अशा खेळाडूंना ऑस्ट्रेलियात दुखापत झाली आहे.


IND Vs AUS | टीम इंडियाला धक्का; ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही बुमराह