IND vs AUS भारतीय क्रिकेट संघाविरोधातील सिडनी कसोटी सामन्यादरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार, खेळाडू टीम पेन (Tim Paine) याला टीकेची झोड सहन करावी लागली. कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी अतीव महत्त्वपूर्ण झेल सोडण्यापासून ते रविचंद्रन अश्विन याच्यासोबतच्या स्लेजिंगमुळं तो अनेकांच्या रोषाचा धनी झाला. ज्यानंतर आपल्याला होणारा विरोध पाहता, त्यानं अखेर या असभ्य वर्तनासाठी माफी मागितली.


आपल्याकडून चूक झाल्याचं म्हणत कधीच अशा प्रकारचं नेतृत्त्व आपण केलेलं नाही, असंही तो म्हणाला. सिडनी कसोटी सामन्यादरम्यान आपल्या नेतृत्त्वात अनेक बाबतीत कमतरता दिसून आली याचा त्यानं स्पष्टपणे स्वीकार केला. 'माझं नेतृत्त्वं अतिशय असमाधानकारक होतं. सामन्यातील तणावाचा थेट परिणाम माझ्या कामगिरीवर झाला आणि त्यामुळं मी चांगलं प्रदर्शन करु शकलो नाही. एक कर्णधार म्हणून माझ्यासाठीचा हा सर्वात वाईट सामना होता'असं पेन म्हणाला.


एलन मस्क यांच्याकडून खान अकॅडमीला 5 दशलक्ष डॉलर्सची मदत 


पेनच्या म्हणण्यानुसार अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघानं अपेक्षित कामगिरी केली नाही. याबाबतच सांगताना तो म्हणाला, 'माझ्यामुळं संघाच्या प्रदर्शनावर परिणाम झाले. मीसुद्धा माणूसच आहे, झाल्या चुकीसाठी मी माफी मागतो'.


IND Vs AUS | टीम इंडियाला धक्का; ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही बुमराह


पेनकडून अपशब्दांचा वापर...


भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू रविचंद्रन अश्विन याच्यासह टीम पेनची शाब्दिक बाचाबाची झाली. त्याबाबतही त्यानं आपली चूक स्वीकारत म्हटलं, 'मी अश्विनशी संवाद साधला आहे. या पूर्ण प्रकरणामध्ये माझाच वे़डेपणा नडला. मीच मर्यादा सोडून बोललो'.


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं अश्विनविरोधात अपशब्दांचा वापर केला. त्याचं हे वक्तव्य स्टंप माईकमध्ये ऐकू आलं. त्यावर अश्विननं त्याला उत्तर देत भारतात येताच तुझी कसोटी कारकिर्द संपवेन असं म्हणत संताप व्यक्त केला. फक्त (R. Ashwin) अश्विनच नव्हे, तर सामन्यादरम्यान पंचाशीही पेननं असभ्य वर्तन करत त्यांच्या निर्णयाला तो आव्हान देताना दिसला. ज्यामुळं त्याच्यावर रितसर कारवाई होत, सामन्याच्या रकमेतील 15 टक्के रक्कम दंड स्वरुपात देण्याची शिक्षाही दिली गेली.