IND vs AUS: टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. येत्या 20 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यापू्र्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसलाय. दुखापतीमुळं ऑस्ट्रेलियाचे 3 प्रमुख खेळाडू संघाबाहेर झाले आहेत. मिचेल स्टार्क (Mitchell Starc), मिशेल मार्श (Mitchell Marsh) आणि  मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) हे तिन्ही खेळाडू दुखापतीमुळं भारताविरुद्ध टी-20 मालिकेत खेळू शकणार नाहीत. ऑस्ट्रेलिया संघानं त्यांच्या पर्यायी खेळाडूंचीही घोषणा केलीय.

भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तसेच मिचेल स्टार्क, मिचेश मार्श, मार्कस स्टॉयनिस यांच्या दुखापतीनंतर वेगवान गोलंदाज नॅथन एलिस, डॅनियल सॅम्स आणि सीन अॅबॉट यांचा समावेश करण्यात आलाय. हे तिन्ही खेळाडू या आठवड्याच्या अखेरीस भारतात दाखल होतील.  स्टॉइनिसला झालेल्या दुखापतीमुळं टीम डेव्हिडचा ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तर, अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ-
अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील वेळापत्रक-

सामना तारीख  ठिकाण
पहिला टी-20 सामना 20 सप्टेंबर 2022 मोहाली 
दुसरा टी-20 सामना 23 सप्टेंबर 2022 नागपूर
तिसरा टी-20 सामना 25 सप्टेंबर 2022 हैदराबाद

 

हे देखील वाचा-