Mahendra Singh Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ्त्ती घेतली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटनं वेगळं स्तर गाठलं. धोनीनं 2007 च्या विश्वचषकात पहिल्यांदा भारतीय संघाची धुरा संभाळली. या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या बाऊल आऊट सामन्यात धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं पाकिस्तानचा पराभव केला, ज्याची आजही जगभरात चर्चा आहे. या बॉल आऊट सामन्यात पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला बॉल स्टंप्सला हिट करता आली नाही. परंतु, भारतानं तिन्ही प्रयत्नात स्टंप्स उडवले, याचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला जातं. त्यानं आखलेल्या रणनीतीमुळं भारताला हा सामना जिंकता आला. 


दरम्यान, 2007 च्या विश्वचषकात 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने सामने आला होता. परंतु, हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यातील निकाल लावण्यासाठी बॉल आऊट सामना खेळण्यात आला. ज्यात दोन्ही संघाला बॉलनं स्पंप्सवर निशाणा साधायचा होता. जिथे दोन्ही संघांना 5-5 संधी मिळाल्या होत्या. जो संघ सर्वाधिक वेळा बॉलनं स्टंप्स उडवणार त्याला विजयी घोषित केलं जाण्याचा नियम होता.


भारताचं पाकिस्तानसमोर 142 धावांचं लक्ष्य
या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 142 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताकडून रॉबिन उथप्पानं 50 धावांची खेळी केली होती. तर, कर्णधार धोनीनं 33 धावांचं योगदान दिलं होतं. भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानच्या संघालाही 20 षटकात 141 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर आयसीसीच्या नियमानुसार, सामन्याचा निकाल बॉल आऊट पद्धतीनं लागणार होता. त्यावेळी सुपर ओव्हरचा नियम नव्हता.  


धोनीच्या उत्कृष्ट नेतृत्वाची झलक
या बॉल आऊट सामन्यात धोनीच्या उत्कृष्ट नेतृत्वाची झलक दिसली, ज्यामुळं पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला. बॉल आऊटसाठी धोनीनं पहिला चेंडू टाकण्यासाठी वीरेंद्र सेहवागची निवड केली. वीरेंद्र सेहवागला पाहून सर्वांनाच त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसला. कारण, तो खूप कमी प्रमाणात गोलंदाजी करायचा. भारताच्या संघात हरभजन सारखे दिग्गज गोलंदाज असतानाही धोनीनं वीरेंद्र सेहवागची निवड करण योग्य समजलं. 


बॉल आऊट सामन्यात भारताचा 3-0 नं विजय
धोनीच्या या निर्णयावर वीरेंद्र सेहवाग खरा उतरला. त्यानं बॉल स्टंप्सला हिट केला. त्यानंतर पाकिस्तानकडून यासिर अराफत स्टंप्सला हिट करण्यासाठी आला. पण, त्याला बॉल स्पंस्टला हिट करता आला नाही. ज्यामुळं बॉल आऊट सामन्यात भारत 1-0 नं आघाडीवर गेला. त्यानंतर भारताच्या दुसऱ्या प्रयत्नात हरभजन सिंहनं बॉल स्पंप्सला हिट करण्याची संधी मिळाली आणि तो यशस्वी ठरला. पाकिस्तानच्या दुसऱ्या प्रयत्नात स्पंप्स हिट करण्यासाठी आलेल्या उमरान गुलच्या पदरात निराशा पडली. भारतासाठी रॉबिन उथप्पाने तिसरा चेंडू टाकला आणि बॉल स्टंप्सला हिट करण्यास त्याला यश आलं. त्यानंतर पाकिस्तानसाठी तिसरा चेंडू टाकण्यासाठी शाहिद आफ्रिदी आला आणि तोही चुकला.अशा प्रकारे भारतानं 3-0 नं  बॉल आऊट सामना जिंकला. परंतु एमएस 


व्हिडिओ-



धोनीचा मास्टर प्लॅन
धोनीने पाकिस्तानविरुद्ध दाखवलेली युक्ती कोणीही ओळखू शकले नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, भारतीय गोलंदाज जेव्हा चेंडू टाकत होते, तेव्हा एमएस धोनी स्टंप्समागं उभा न राहता स्टंपजवळ बसला. तर पाकिस्तानचा यष्टिरक्षक कामरान अकमल ऑफ स्टंपच्या बाहेर उभा होता. याचा फायदा भारताच्या गोलंदाजांना मिळाला. याशिवाय, वेगवान गोलंदाजांना रिकाम्या स्टंपवर मारणं सोपं जाणार नाही, याची जाणीव असल्यानं धोनीनं वेगवान गोलंदाजाकडं बॉल सोपवला नाही.


हे देखील वाचा-