Mohammed Siraj Fans Trolled : मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आटोपला आहे. यजमान संघाने पहिल्या डावात 474 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने जबरदस्त खेळी केली. त्याने 197 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शानदार 140 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावरच कांगारू संघ एवढी मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 आणि रवींद्र जडेजाने 3 विकेट घेतल्या.
खेळाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑस्ट्रेलिया फलंदाजीला आला. तेव्हा मोहम्मद सिराजला पहिले षटक देण्यात आले, पण तो खूप महागडा ठरला. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 22 षटकात 115 धावा दिल्या. त्याने 5.50 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. यावरून सिराज किती महागात पडला याचा अंदाज लावता येतो आणि त्यामुळेच त्याच्यावर ट्विटरवर बरीच टीका होत आहे. चाहत्यांनी मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची खिल्ली उडवली. सिराजचा हा शेवटचा सामना आहे, असे काही चाहते म्हणत आहे.
सध्याच्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. डीएसपी सिराजने आतापर्यंत सात डावांत 3.87 च्या खराब इकॉनॉमी रेटने 13 बळी घेतले आहेत. बघितले तर सिराजने या मालिकेत विकेट घेतल्या आहेत, पण त्याने 380 धावा दिल्या आहेत जे सर्व गोलंदाजांमध्ये जास्त आहे.
ॲडलेडमध्ये सिराजला मिळाली होती शिक्षा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲडलेड कसोटीदरम्यान मोहम्मद सिराज चर्चेत होता. ॲडलेड कसोटीत ट्रॅव्हिस हेडला आऊट केल्यानंतर सिराजने रागात सेलिब्रेशन केले. आणि त्याला हातवारे करत पॅव्हेलियनमध्ये जायला सांगितले. पॅव्हेलियनमध्ये परतताना हेडनेही सिराजला काहीतरी म्हणाला. आयसीसीने या घटनेसाठी सिराजला शिक्षा केली आणि मॅच फीच्या 20% दंड ठोठावला. याशिवाय सिराज आणि हेड यांना एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला.
हे ही वाचा -