IND vs AUS | टीम इंडिया चौथा कसोटी सामना जिंकत मालिकेवर कब्जा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. परंतु, सध्या टीम इंडियाला वेगळ्याच आव्हानाचा सामना करावा लागत आहे. टीम इंडियाला ग्रहण लागलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण टीम इंडियामधील खेळाडूंच्या दुखापतीचं सत्र सध्या सुरु आहे. दुखापतग्रस्त खेळाडू हा टीम इंडियासाठी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात कोण-कोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार?
अनेक खेळाडू दुखापतग्रस्त
मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जाडेजा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल आणि रविचंद्रन अश्विन हे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंत दुखापतग्रस्त झाले आहेत. तसेच सीरिजपूर्वी देखील काही खेळाडू दुखापतीचा सामना करत होता. त्यामध्ये इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश होतो.
दुखापतग्रस्त खेळाडूंची मोठी यादी पाहिल्यानंतर आता नेमकं कोणत्या खेळाडूंचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणाऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करणार, हा खरंच मोठा प्रश्न आहे.
कोणाचा होऊ शकतो टीम इंडियात समावेश?
चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करताना दिसून आला. अशातच आशा व्यक्त करण्यात येत आहे की, त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात येऊ शकतो. तसेच वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि इरफनमौला वाशिंगटन सुंदरही प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झाला होता. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. बुमराहच्या जागी टी नटराजन किंवा शार्दुल ठाकूर खेळताना दिसू शकतो. तसेच शेवटच्या कसोटी सामन्यात हनुमा विहारी ऐवजी वॉशिंगटन सुंदरला संधी मिळू शकते.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. चौथा कसोटी सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावे करणार आहे. टीम इंडियाने ज्याप्रकारे तिसरा कसोटी समाना ड्रॉ केला होता. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात पराभूत करत मालिका खिशात घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसेल, याच काहीच शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या :