Ind vs Aus Border Gavaskar Trophy 2024-25: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy 2024-25) खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे होणार असून, त्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने 13 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी नुकताच संघ जाहीर केला असून यामध्ये टीम इंडियाला एक मोठे सरप्राईज मिळालं आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी, भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती. ऑस्ट्रेलिया-अ संघाने भारत-अ संघाचा मालिकेत 2-0 असशा फरकाने पराभव केला. या मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाकडून सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर नॅथन मॅकस्विनीचा पर्थ येथे होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.
कोण आहे नॅथन मॅकस्विनी?
नॅथन मॅकस्विनीने भारत अ विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील दोन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या चार डावात ५५.३३ च्या सरासरीने १६६ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरच्या जागी नॅथन मॅकस्विनीला सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत कायमस्वरूपी सलामीवीर सापडलेला नाही.
ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली काय म्हणाले?
ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी आधीच स्पष्ट केले होते की, स्टीव्ह स्मिथ त्याच्या जुन्या फलंदाजीच्या क्रमात दिसणार आहे. तसेच नॅथन मॅकस्विनीच्या निवडीबाबत विचारले असता त्याने नुकतेच तो किती धावा करु शकतो, कशी फलंदाजी करु शकतो, हे दाखवून दिले आहे. नॅथन मॅकस्विनी उत्कृष्ट देशांतर्गत विक्रमांमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया-अ संघासाठी चांगला खेळला, असं बेली यांनी सांगितले.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
भारताचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा पुढीलप्रमाणे -
पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 06-10 डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी, सिडनी
संबंधित बातमी:
भारत की ऑस्ट्रेलिया...बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कोण जिंकणार?, रिकी पॉन्टिंगची धक्कादायक भविष्यवाणी