Ricky Ponting Prediction On Border Gavaskar Trophy 2024-25: बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मधील पाच कसोटी सामने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये होणारी ही ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्यात दाखल व्हायचे असल्यास भारताला 4-1 अशा फरकाने ऑस्ट्रिलायविरुद्धची कसोटी मालिका जिंकावी लागेल.
रिकी पॉटिंग काय म्हणाला?
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू आणि कर्णधार रिकी पॉटिंगने एक भविष्यवाणी केली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीशिवाय टीम इंडियासमोर कसोटीत 20 विकेट्स घेण्याचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा निकाल 3-1 असा असेल. यजमान ऑस्ट्रेलिया तीन सामने जिंकेल आणि पाहुणे संघ भारत एक सामना जिंकेल, अशी भविष्यवाणी रिकी पॉटिंगने केली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया या मालिकाविजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या फायनलमध्ये प्रवेश करेल, असा विश्वासही रिकी पॉटिंगने व्यक्त केला आहे.
सुनील गावसकर काय म्हणाले?
मला वाटत नाही की भारत ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करू शकेल. जर तसे झाले तर ती एक मोठी उपलब्धी असेल, परंतु सध्या त्याच्याकडून अपेक्षा ठेवणे योग्य नाही. मला वाटते की संघाने फक्त जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मालिका 1-0, 2-0 किंवा 3-1 अशी असली पाहिजे. यामुळे संघाच्या कामगिरीत स्थिरता येईल आणि चाहत्यांनाही संघाचा अभिमान वाटेल.
भारताचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा पुढीलप्रमाणे -
पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 06-10 डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी, सिडनी
कोण मारणार बाजी?
बऱ्याच काळानंतर बॉर्डर-गावसकर मालिकेत 2024-25 मध्ये 5 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेअंतर्गत शेवटच्या वेळी 1991-92 मध्ये 5 कसोटी सामने खेळले गेले होते. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.