Australia vs India, 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस असून ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवातही चांगली झाली होती. या सामन्याच्या निकालामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील भारताचा मार्ग बिघडू शकतो. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन यांच्यातील भांडण चर्चेचा विषय राहिला आहे. चौथ्या सामन्यातही जेव्हा दोघेही आमनेसामने आले तेव्हा असे काही घडले ज्याने कांगारू फलंदाज वेदनेत दिसला.


बॉक्सिंग डे कसोटीकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. खेळाच्या पहिल्या दिवसापासूनच उत्साह शिगेला पोहोचला आहे. युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टासने या सामन्यात कसोटी पदार्पण करत स्फोटक अर्धशतक झळकावून भारतीय गोलंदाजीचा चांगलाच सामाचार घेतला. रवींद्र जडेजाने त्याची विकेट घेतली आणि त्यानंतर टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केले. पण पहिला विकेट पडल्यानंतर मार्नस लॅबुशेन फलंदाजीला आला. 


सिराजचा 'तो' घातक बॉल मार्नसच्या लागला अवघड जागी  


मोहम्मद सिराज आणि मार्नस लॅबुशेनमध्ये गेल्या सामन्यात चांगले वातावरण तापले होते, त्यांचा परिणाम या सामन्यातही दिसून आला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 33 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहम्मद सिराजच्या पहिल्या चेंडूवर मार्नस लॅबुशेनला किरकोळ दुखापत झाली. पण पुढचा चेंडू त्याच्या अवघड जागी लागला, तेव्हा तो वेदनेने कळवळला. त्यानंतर फिजिओ धावतच मैदानात आले पण लॅबुशेन अशा जागी बॉल लागला की कोणीही काही करू शकत नव्हते. बॉल लागल्यानंतर काही काळ अस्वस्थ झाल्यानंतर लॅबुशेनने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली. 




सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या दिवशी चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावून 176 धावा केल्या आहेत. सध्या स्टीव्ह स्मिथ 10 धावांवर नाबाद असून मार्नस लॅबुशेन 44 धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने 28 षटकांत 64 धावा केल्या आणि उस्मान ख्वाजाच्या रूपाने एक विकेट गमावली. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून 112 धावा केल्या होत्या. सॅम कॉन्स्टास आणि ख्वाजा यांच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले. जडेजाने कॉन्स्टास 60 धावावर तर बुमराहने ख्वाजा 57 धावावर आऊट केले.


हे ही वाचा -


Virat Kohli for Sam Konstas : विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?