Australia vs India 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रोमांचक मोडवर आला आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या घातक गोलंदाजी केली, पण नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलंड यांनी भारताच्या आनंदावर विरजण घातले, त्याने 10व्या विकेटसाठी 110 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सवर 228 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने भारतावर 333 धावांची आघाडी घेतली आहे.
बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला ऑलआउट करू शकला नाही. 91 धावांत 6 विकेट पडल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने 9 विकेटवर 228 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या जोडीने आतापर्यंत 110 चेंडूंचा सामना केला आहे. लियॉन 41 आणि बोलंड 10 धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये 55 धावांची भागीदारी झाली आहे.
जसप्रीत बुमराहची किलर गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर सॅम कॉन्स्टास अवघ्या 8 धावा करून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर आऊट झाला. उस्मान ख्वाजा (21)ही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. स्टीव्ह स्मिथ आणि लॅबुशेन यांच्यात 37 धावांची भागीदारी झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन विकेट्स 80 अशी होती. यानंतर संघाने 11 धावा करताना चार विकेट गमावल्या. स्मिथला सिराजने बाद केले. यानंतर बुमराहने त्याच षटकात हेड (1) आणि मार्श (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॅरीही 2 धावा करून बुमराहच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.
मार्नस लॅबुशेन अन् कमिन्सने सांभाळला डाव
यशस्वी जैस्वालने मार्नस लॅबुशेनचा सोपा झेल सोडला. यामुळे त्याने कमिन्सच्या साथीने डाव सांभाळला. यादरम्यान लॅबुशेननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांमध्ये 57 धावांची भागीदारी झाली. सिराजने लॅबुशेनची (70) विकेट घेतली. मिचेल स्टार्कही 5 धावा करून लगेचच धावबाद झाला. कमिन्स (41) रवींद्र जडेजाने 173 धावांवर बाद झाला.
173 धावांत 9 गडी बाद झाल्यानंतर नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलंड यांनी साथ दिली. आतापर्यंत शेवटच्या जोडीने 17.4 षटके खेळली आहेत. पहिल्या डावातही दोघांनी 8.3 षटके फलंदाजी केली होती. त्यांच्या या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने 300 हून अधिक आघाडी घेतली आहे.
हे ही वाचा -