India Vs Australia 4th Test : मेलबर्न येथे चालू असलेल्या चौथ्या कसोटीत चांगलाच थरार पाहायला मिळतोय. आज चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांना सळो-की-पळो करून सोडलं. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या सॅम कॉन्स्टासने भारताच्या गोलंदाजांना नामोहरम करून टाकलं होतं. पण याच  सॅम कॉन्स्टासला जसप्रित बुमराहने अवघ्या 8 धावांवर थेट बाद करून टाकलं. विशेष म्हणजे सॅम कॉन्स्टास बाद झाल्यानंतर बुमराहने केलेल्या सेलिब्रेशनची तर सगळीकडे चर्चा होत आहे. हे सेलिब्रेशन पाहून बुमराहने विराटचा बदला घेतला, असं म्हटलं जातंय. 


बुमहाहने सॅम कॉन्स्टासला केलं बाद 


ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जसप्रित बुमराहने सॅम कॉन्स्टासला अवघ्या आठ धावांवर बाद केलं.  सातवे षटक चालू असताना सॅम कॉन्स्टासचा बुमहराहने थेट त्रिफळा उडवला. सॅम कॉन्स्टासचा त्रिफळा उडताच जसप्रितने क्रिकेटप्रेमींना दोन्ही हात दाखवले. तसेच आणखी चिअर करा, असं हातांनीच खुणावलं. 






जसप्रीतने घेतला विराटचा बदला 


जसप्रित बुमराहची ही कृती सॅम कॉन्स्टाससारखीच होती. या सामन्याच्या पहिल्या डावात विराट कोहली बाद झाल्यानंतरने दोन्ही हात वर करून सेलिब्रेशन केलं होतं. त्याने चाहत्यांना आणखी चिअर करा असं दोन्ही हात वर करून सुचवलं होतं. सॅमची ही कृती विराटला डिवचण्यासाठी करण्यात आल्याचंही म्हटलं जाऊ लागलं. म्हणूनच विराटला डिवचण्याचा बदला म्हणून जसप्रितनेही अगदी सॅम कॉन्स्टाससारखीच नक्कल केली. बुमराहच्या या  सेलिब्रेशनची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. बुमराहने सॅम कॉन्स्टासला जशास तसं उत्तर दिलंय, असं क्रिकेटप्रेमी म्हणत आहेत. 






मोहम्मद सिराजनेही स्टिव्ह स्मिथला दिलं उत्तर 


दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला चांगलाच धडा शिकवला. स्टिव्ह स्मिथने फलंदाजी करत असताना तोंडावर बोट ठेवून शांत राहा असं सुचवलं होतं. त्यानंतर सिराजनेही त्याला बाद करून मैदानावरच तोंडावर बोट ठेवून शांत राहा असं सांगितलं. स्टिव्ह स्मिथला सिराजने जसंच्या तसं उत्तर दिलं.  


हेही वाचा :


विराटनं सांगितलं, सिराजनं फॉलो केलं, दोघांनी असं जाळं टाकलं की स्टिव्ह स्मिथ पुरता अडकला, 'त्या' प्लॅनिंगची इनसाईड स्टोरी!


Ind vs Aus 5th Test : मेलबर्न कसोटीदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत, सिडनीत सामन्यातून बाहेर; बोर्ड करणार बदलीची घोषणा


IND vs AUS 4th Test : नितीश रेड्डीची खेळी पाहून रवी शास्त्रीही गहिवरले; कॉमेट्री करताना अश्रू अनावर, पाहा भावूक करणारा VIDEO