Rohit Sharma on Mohammed Shami : ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 10 विकेट्सनी पराभव झाला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने मालिका 1-1 अशी बरोबरी साधली. या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज निष्प्रभ दिसले. अशा परिस्थितीत भारताच्या पराभवानंतर मोहम्मद शमीची चर्चा सुरू झाली.
ॲडलेड कसोटीत भारताचा पराभव झाल्यानंतर वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर अनेक अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषद घेण्यासाठी गेला तेव्हा ॲडलेड कसोटीत खेळणारे खेळाडू जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांच्याबद्दल केवळ प्रश्नच विचारले गेले नाहीत तर ऑस्ट्रेलियाला न गेलेल्या मोहम्मद शमीबद्दलही प्रश्नच विचारले. रोहित शर्माने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
सामना गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत पोहोचलेल्या कर्णधार रोहित शर्माला मोहम्मद शमीला किती मिस केले जात आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याची दुखापत कशी आहे? तो ऑस्ट्रेलियात कधी येऊन संघात सामील होऊ शकतो? रोहितनेही या प्रश्नांची एक-एक उत्तरे दिली. तो म्हणाला, 'शमीसाठी संघाचे दरवाजे नेहमीच खुले आहे. जेव्हा तो येईल तेव्हा संघात सामील होऊन खेळेल. बीसीसीआयच्या डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
संघ शमीच्या पुनरागमनासाठी घाई करण्याच्या मनस्थितीत नसल्याचेही रोहित शर्माने स्पष्ट केले. तो म्हणाला की, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने काही सामने खेळले आहेत. त्याचा गुडघा सुजला होता. त्यामुळे त्याच्या तयारीत फरक पडला. सामना खेळण्यापूर्वी त्याला कसे वाटते? 4 षटके टाकल्यानंतर आणि 20 षटके मैदानावर खेळल्यानंतर शमीचा फिटनेस कसा आहे? या सर्व गोष्टींवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. आम्ही घाई करून त्यांच्यावर कोणताही दबाव आणू इच्छित नाही.
2019 वर्ल्ड कप फायनलनंतर शमीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर मोहम्मद शमीने नोव्हेंबरमध्ये बंगालकडून रणजी ट्रॉफी सामने खेळले. त्याने मध्य प्रदेशविरुद्ध 7 विकेट घेतल्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 7 सामने खेळले आहेत आणि 27.3 षटकात 8 बळी घेतले आहेत. त्याला ऑस्ट्रेलियाला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नसली तरी, तो लवकरच संघात सामील होऊ शकतो.
हे ही वाचा -