IND vs AUS, ODI Match Preview : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज (19 मार्च) एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 5 विकेट्सनं रोमहर्षक विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता आजचा सामना जिंकून भारत ऑस्ट्रेलियाविकरुद्ध एकदिवसीय मालिकाविजय मिळवू शकतो. याआधी भारतानं कसोटी मालिकेत कांगारुंना 2-1 ने मात दिली असून आता एकदिवसीय मालिका विजयासाठीही भारत सज्ज झाला आहे. यंदाच्या वर्षीच एकदिवसीय चषक खेळवला जाणार असल्याने दोन्ही संघासाठी ही एकदिवसीय मालिका महत्त्वाची आहे, तर अशा या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहू शकता ते पाहूया...


सामना कधी होणार?


भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये आज म्हणजेच 19 मार्च रोजी दुसरा सामना होणार आहे.


सामना कुठे होणार?


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना विशाखापट्टणममधील क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.


सामना किती वाजता सुरु होईल?


भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 1 वाजता टॉस होईल.





सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 या चॅनेलवर दुपारी 1.00 वाजता सुरु होईल.  तसंच या सामन्याचं ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार या अॅप आणि वेबसाइटवरुन पाहता येईल.


कसे आहेत दोन्ही संघ?


भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.


ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा


भारताचा सलामीच्या वन-डेमध्ये विजय


पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अप्रतिम गोलंदाजी केली. सिराज आणि शामी यांच्या धारधार गोलंदाजीपुढे कांगारुंनी लोटांगण घातले. ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 188 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर 189 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज फेल होताना दिसत होते. पण तेव्हाच केएल राहुलचे अर्धशतक आणि रविंद्र जाडेजाची संयमी खेळी याच्या बळावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.


हे देखील वाचा-