IND vs AUS 1st Test Perth Pitch Report : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका जसजशी जवळ येत आहे, तसतसे क्रिकेटचे वातावरणही गरम होत आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. जे फार जुने स्टेडियम नाही, पण येथील आठवणी भारतीय संघासाठी खूप कटू आहेत.
दरम्यान, खेळपट्टीबाबत अपडेट मिळत आहे. पर्थची खेळपट्टी वेगवान गती आणि बाउंससाठी ओळखली जाते आणि यावेळीही खेळपट्टीचा मूड असाच राहू शकतो. अशा स्थितीत पहिली कसोटी ही फलंदाजांसाठी खडतर कसोटी म्हणता येईल.
ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे मुख्य क्युरेटर आयझॅक मॅकडोनाल्ड म्हणाले की, "हे ऑस्ट्रेलिया आहे आणि हे पर्थ आहे. मला तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे की या खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगली मदत मिळते, येथे वेगवान गोलंदाजाना चांगला बाउंस मिळेल." गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जशी खेळपट्टी तयार करण्यात आली होती, तशीच खेळपट्टी तयार करण्याचा मॅक्डोनाल्डचा प्रयत्न आहे. त्या सामन्यात एकूण 35 विकेट पडल्या, त्यापैकी 28 विकेट वेगवान गोलंदाजांच्या नावावर होत्या. पाकिस्तान संघ हा सामना 360 धावांनी हरला होता.
पर्थचे ऑप्टस स्टेडियम 2017 पासून सातत्याने कसोटी सामन्यांचे आयोजन करत आहे. खेळपट्टी कशी असेल या प्रश्नावर क्युरेटर मॅकडोनाल्ड म्हणाले की, 10 मिमी गवत सोडण्याचा विचार केला जात आहे. गेल्या वर्षीही अशी खेळपट्टी चांगली ठरली होती आणि सुरुवातीचे काही दिवस खेळपट्टी सेम राहिल. खेळपट्टीवर गवत म्हणजे वेगवान गोलंदाजांना मदत. गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्याप्रमाणेच या वेळीही वेगवान गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी तयार केली जात आहे. ऑस्ट्रेलियाचे तीन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी अलीकडेच येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 140 धावांत गुंडाळले होते .
भारतीय संघ : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, रविचंद्रन अश्विन, अभिमन्यू इसवरन, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार. रेड्डी, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर.
हे ही वाचा -