एक्स्प्लोर

सिराज-शामीची कमाल अन् राहुल-जडेजाची धमाल, ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्सने विजय

IND vs AUS, 1st ODI :

IND vs AUS, 1st ODI  : सिराज आणि शामी यांच्या धारधार गोलंदाजीपुढे कांगारुंनी लोटांगण घातले होते. ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 188 धावांत संपुष्टात आला होता. पण प्रत्युत्तर दाखल भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली होती. पण केएल राहुलचे अर्धशतक आणि रविंद्र जाडेजाची संयमी खेळीच्या बळावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 189 धावांच्या आव्हान भारताने पाच विकेट्स शिल्लक ठेवत पार केले. 

भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिराजने ट्रेविस हेड याला स्वस्तात बाद करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. पण स्मिथ आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभळला. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली होती. ही जोडी धोकादायक होतेय असे वाटत असतानाच हार्दिक पांड्याने स्मिथचा अडथळा दूर केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होते. मिचेल मार्श याने एक बाजू लावून धरली होती. पण जाडेजाने मार्श याला तंबूत पाठवत मोठा अडथळा दूर केला. मार्शने 81 धावांची खेळी केली. त्याशिवाय स्मिथ 22, लाबुशेन 15, जोश इंग्लिश 26, कॅमरुन ग्रीन 12, ग्लेन मॅक्सवेल 8, स्टॉयनिस 5 आणि सीन एबॉट 0 यांना मोठी खेळी करता आली नाही. परिणामी ऑस्ठ्रेलियाचा डाव 35 षटकात 188 धावांत संपुष्टात आला. भारताकडून सिराज आणि शामी यांनी धारधार गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. अवघ्या 39 धावांत भारताने आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी डाव सांभाळला. जोडी जमली असे वाटत असतानाच हार्दिक पांड्या बाद झाला. त्यानंतर राहुल आणि रविंद्र जाडेजा या जोडीने नाबाद राहात भारताला विजय मिळवून दिला. राहुलने नाबाद 75 तर रविंद्र जाडेजाने नाबाद 45 धावांची खेळी केली. त्याशिवाय हार्दिक पांड्याने 25 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.  ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने भेदक मारा केला. स्टार्कने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. तर स्टॉयनिस याने दोन विकेट घेतल्या. 

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget